sai and lalit movie colorful
sai and lalit movie colorful 
मनोरंजन

ललित-सईच्या 'कलरफूल' आठवणींची गोष्ट

सकाळ ऑनलाइन

मराठी चित्रपटातील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळवली. मालिकेबरोबरच ललितने चित्रपटांमध्येही काम केले आहे. तर दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. दुनियादारी, वजनदार, गर्लफ्रेंड, धुरळा, हंटर या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सई तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. हे दोघं आता आगामी 'कलरफूल' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. 

या चित्रपटात ललित - सईची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळेल. ललित आणि सईने या चित्रपटाचा पोस्टर  सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'आठवणींची गोष्ट आणि गोष्टींची आठवण ! कलरफुल' असं कॅप्शन या फोटोला त्यांनी दिले आहे.

या चित्रपटात सई मीराच्या भूमिकेत दिसणार आहे तर ललित करणच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २ जुलैला प्रदर्शित होणार आहे. कलरपुल या चित्रपटामध्ये रंगाने भरलेली लव्ह स्टोरी पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. सई आणि ललित पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत त्यामुळे यो दोघांना एकत्र पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT