Madhuri Dixit And Dr Shriram Nene  Esakal
मनोरंजन

Shriram Nene Video: माधुरी दीक्षितच्या 'अहों'चं अमेरिकन मराठी एकदा ऐकाच! डॉ. श्रीराम नेनेंचा व्हिडिओ व्हायरल

डॉ. श्रीराम नेने यांचा व्हिडिओ व्हायरल!

Vaishali Patil

Madhuri Dixit And Dr Shriram Nene: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरी आता जरी चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय नसली तरी ती सोशल मिडियावर सक्रिय असते. अलीकडेच माधुरीने पती श्रीराम नेने यांच्यासोबत निर्माता म्हणून तिच्या आगामी 'पंचक' या मराठी चित्रपटाची घोषणा केली.

पंचक या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच रिलिज करण्यात आला आहे. यावेळी माधुरी आणि नेने हे PVR-Phoenix येथे 'पंचक' च्या ट्रेलर लाँचला उपस्थित होते. आता या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत श्रीराम नेने मराठी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी हसत आहेत तर काहींना त्यांची बोलण्याची स्टाइल खूपच आवडली आहे.

'पंचक' ट्रेलरच्या लाँचनंतर माधुरी आणि तिचा पती डॉ. श्रीराम नेने यांनी मिडियासोबत संवाद साधला. यावेळी नेने यांनी मीडियाशी बोलताना मराठी चित्रपटांबद्दल हिंदी न बोलता मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिशय छान प्रकारे त्यांनी मराठीत संवाद साधला. मात्र त्यांचा अॅक्सेंट वेगळा असल्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ खुप आवडला. ते तुटक्या मराठी इंग्रजी शैलीत मिडियाशी बोलले.

या व्हिडिओत ते म्हणतात, 'मराठी चित्रपटात अर्थ असतो, भावना असतात, पण त्या कशा व्यक्त करायच्या आणि पाहायच्या हे मला आज कळलं.' त्यांनी हा सिनेमा पाहण्याचे आवाहन केले. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे. तर अनेकांना 'युवर मराठी अ‍ॅक्सेंट इज सो क्यूट.. प्लीज से इट अगेन' वाला रील ट्रेंड आठवला आहे.

डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने यांचा 'पंचक' चित्रपट येत्या नवीन वर्षात 5 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी या चित्रपटात अभिनय करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT