star pravah : यू ट्यूब च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली एक यू ट्यूबर म्हणजे मधुरा बाचल. आपल्या 'मधूराज रेसिपी' या यू ट्यूब चॅनेल द्वारे तिने खवय्याच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्याला एखादा पदार्थ करताना अडचण आली तर सहज तिच्या नावाने लॉक सर्च करतात आणि अनेकांचे प्रश्न सुटतात. अशी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली मधुरा आता मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. स्टार प्रवाह वरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत तीची दमदार एंट्री होणार आहे.
(madhurs recipe fame madhura bachal grand entry in sukh mhanje nakki kay asta serial on star pravah)
मधुरा आता लवकरच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत सध्या सुरु आहे 'सुगरण नंबर वन पाककला स्पर्धेची धूम'. या स्पर्धेत गौरी, शालिनी आणि देवकीसोबतच कोल्हापुरातील बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता वाढली आहे. खास बात म्हणजे ही स्पर्धा जज करणार आहे मधुराज रेसिपी फेम मधुरा बाचल. मधुराच्या रेसिपीजचे बरेच चाहते आहेत. मात्र पहिल्यांदाच मधुरा मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे.
मधुराने या आधीही मालिकेमध्ये काम केले आहे. झी मराठी वरील 'किचन कल्लकार' मध्ये मधुरा सहभागी कलाकारांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करत होती. या कार्यक्रमात तीची महत्वाची भूमिका होती. पण काही कारणामुळे तिने हा शो सोडला आणि काही दिवसातच ती नव्या मालिकेत दिसणार आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं'च्या माध्यमातून टू प्रथमच कौटुंबिक मालिकेत पदार्पण करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.