अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांच्या घरचा गणपती हा मनोरंजन विश्वातील एक मानाचा गणपती मानला जातो. कित्येक कलाकार आणि परिचित आवर्जून त्यांच्या बाप्पाच्या दर्शनाला जातात. त्यांच्या घरी होणारी फुलांची आरास, सुबक मूर्ती हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय असतो. यंदा नानांच्या घरी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी हजेरी लावली. नुकतेच त्यांनी नाना पाटेकर यांच्या पुण्यातील घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नानांनी मुख्यमंत्र्यांसाठी स्वतःच्या हाताने चुलीवरचं पिठलं केलं.
(maharashtra cm eknath shinde visit actor nana patekar home on occasion of ganeshotsav 2022 nsa95)
नाना पाटेकर यांचा बाप्पा पूर्वी त्यांच्या मुंबईतील माहीमच्या जुन्या घरी साजरा व्हायचा. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कला, समाजिक, राजकीय क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी नाना पाटेकर जात असे. पण यंदा नानांनी आपल्या घरचा बाप्पा माहीम येथील घरात न बसवता तो पुण्यातील फार्म हाऊसवर बसवला आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी दर्शना सोबतच एकनाथ शिंदे यांनी नानांनी मनसोक्त गप्पाही केल्या.
अभिनेते नाना पाटेकर यांच्या सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे येथीस फार्म हाऊसवर एकनाथ शिंदे यांनी भेट दिली . त्यानंतर गप्पा आणि जेवण असा खास बेट आखण्यात आला होता. नानांच्या बागेत जाऊन एकनाथ शिंदे यांनी वृक्षारोपणही केलं. नानांनी स्वतःच्या हाताने मुख्यमंत्र्यांसाठी चुलीवरचं पिठलं केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्याबरोबर यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री विजय शिवतारे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुरातत्वचे सहसंचालक विलास वाहने, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.