shivali parab, maharashtrachi hasyajatra, shivali parab photoshoot, kalyan, shivali parab news SAKAL
मनोरंजन

Shivali Parab: हा अभिनेता आहे शिवालीचा क्रश, शिवाली त्याच्या प्रेमात आहे एकदम वेडी

शिवाली सगळ्यांची क्रश आहे. पण शिवालीचा क्रश कोण आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला

Devendra Jadhav

Shivali Parab News: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून अल्पवधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवाली पराब. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातले प्रेक्षक शिवालीचे फॅन्स आहेत. याच महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली दीपक परब.

शिवालीने सकाळ Unplugged मध्ये एक खास खुलासा केलाय. तो म्हणजे शिवालीचा क्रश. शिवाली कोणावर वेड्यासारखी प्रेम करते याचा खुलासा तिने केलाय. जाणून घेऊ

शिवाली सगळ्यांची क्रश आहे. पण शिवालीचा क्रश कोण आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला

यावर शिवाली म्हणाली, "मला शाहरुख खूप आवडतो. म्हणजे प्रचंड आवडतो. माझा शाहरुखवर अगदी नेक्स्ट लेवलचं क्रश आहे. माझी इच्छा आहे. मी व्हिडिओज बघते इंस्टाग्रामला, की तो सरप्राइज द्यायला कुठेकुठे भेटायला जातो. त्यांना आणि त्यांच्या फॅन्सना सरप्राइज देतो भेटून वैगरे. सो माझं डेंजर लेव्हलचं क्रश आहे SRK वर.

शिवालीची कल्याणची चुलबूली म्हणून ओळख आहे. शिवालीचे वडील रिक्षा चालवतात. आई शिवणकाम करणारी गृहिणी. एक लहान बहीण.

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या शिवालीने सर्वांसारखं शिकून छोटीमोठी नोकरी करून घराला आधार देण्याची इच्छा बाळगलेली. अगदी शिवालीने अनेक ठिकाणी जॉब साठी इंटरव्हू सुद्धा दिले.

शिवाली गणितात हुशार. त्यामुळे तिने कॉमर्सचा पर्याय निवडला. गणितात हुशार असलेल्या शिवालीने कॉमेडीचं गणितही अचूक ओळखलं.

महाराष्ट्राची हास्यजत्रा शो साठी संधी मिळाल्यावर शिवालीने त्या संधीच खऱ्या अर्थाने सोनं केलं. टीव्ही समोर लहानपणी कॉमेडी शो पाहणारी शिवाली आज हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आणि मनामनावर अधिराज्य गाजवू लागली.

याशिवाय शिवालीने तिचा आजवरचा प्रवास, हास्य जत्रेतील गमतीजमती, शिवाली अवली कोहली या कॅरेक्टरचा जन्म कसा झाला, हास्यजत्रेतील प्रसाद ओक, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी कडून ती कोणती गोष्ट शिकली आहे?

असे काही खास किस्से तिने सकाळ Unplugged मध्ये बोलताना सांगितले, तेव्हा या दिलखुलास गप्पा वरील दिलेल्या लिंक वर नक्की ऐका...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT