poovachal khadar
poovachal khadar Team esakal
मनोरंजन

प्रसिद्ध गीतकार पूवाचल खादर यांचे निधन

युगंधर ताजणे

मुंबई - मल्याळम चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार पूवाचल (poovachal khadar) खादक यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खादर यांनी 70 आणि 80 (malayalam lyricist) च्या दशकात मल्याळम सिनेमामध्ये आपल्या नावाची मोहोर उमटविली होती. त्यांनी एकापेक्षा एक सरस अशा गीतांचे लेखन केले होते. त्यांच्या गीतांची गोडी अद्याप प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यांच्या जाण्यानं मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. (malayalam lyricist poovachal khadar passes away)

70 ते 80 च्या दशकामध्ये त्यांच्या गीतांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूवाचल यांना कोरोना झाला होता. आणि सरकारी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचारही सुरु होते. 73 वर्षांच्या खादर यांना निमोनिया झाला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनानं सांगितलं, खादर यांच्यावर कोणत्याही औषधाची मात्रा चालत नव्हती. त्यानंतर त्यांचे एकापाठोपाठ एक अवयव निकामी होत होते.

खादर यांनी 400 चित्रपटांमधून 1500 गीतांचे लेखन केले होते. मल्याळम भाषेतून त्यांनी अनेक हिट चित्रपट गीतं लिहिली. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या नावाचा ठसा मल्याळम चित्रपटसृष्टीवर उमटविला. त्यांनी यसुदास, पी जयचंद्रन, एस जानकी यांच्यासारख्या गीतकारांसाठी गीतलेखन केले. केवळ गीतकार म्हणूनच नव्हे तर एक निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले होते.

तिरुवनंतपुरम येथे 25 डिसेंबर 1948 रोजी जन्म झालेल्या खादर हे सरकारी अभियंता होते. त्यांनी 1973 मध्ये मल्याळम चित्रपट क्षेत्रात इंट्री केली होती. 2011 पर्यत ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT