hruta durgule, raj thackery, ajikya raut
hruta durgule, raj thackery, ajikya raut file view
मनोरंजन

'मन उडू उडू झालं' इंद्रा-दिपूनं घेतली राज ठाकरेंची भेट

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण महाराष्ट्राचं मन सध्या उडू उडू झालं आहे कारण झी मराठीवरील नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला मन उडू उडू झालं हा कार्यक्रम. त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या बनल्या आहेत. कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना फार आवडत आहे. अशातच इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी एका आघाडीच्या नेत्याची भेट घेतली.

संपूर्ण मुंबईभरात प्रचलित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित लोकप्रिय कार्यक्रम 'दीपोत्सव' दरवर्षप्रमाणे यंदाही 'शिवतीर्थ' (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे पार पडला. ऋता आणि अजिंक्य यांच्या सोबतच शर्मिला राज ठाकरे, अमित ठाकरे या मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्याचवेळी ऋता आणि अजिंक्य यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव खूपच अविस्मरणीय असल्याची भावना दोन्ही कलाकारांनी व्यक्त केली.

man udu udu jhaal team

अजिंक्य राऊत म्हणाला, "मन उडू उडू झालं हि मालिका आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेवर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेम करत आहेत. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत आणि त्यामुळेच आम्हाला आज या मान्यवरांच्या उपस्थित दीपोत्सव या सोहळ्याला येण्याचा बहुमान मिळाला यासाठी मी खरंच खूप आनंदी आहे. माननीय राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता असं मी म्हणेन."तर सध्या ही मालिका प्रेक्षकांना फार आवडत आहे, आणि या मालिकेचे शीर्षक गीत देखील प्रसिद्ध होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

MHT CET 2024 Results: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, थेट लिंकवरून असा पाहा निकाल

Latest Marathi News Live Update : आण्णासाहेब पाटील महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

Smriti Mandhana: स्मृतीचं द. आफ्रिकेविरुद्ध खणखणीत शतक! 'हा' पराक्रम करणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटर

SCROLL FOR NEXT