Ritesh Deshmukh
Ritesh Deshmukh Google Images Actor Ritesh Deshmukh
मनोरंजन

'एक नारळ दिलाय दर्या देवाला..'; पहा रितेशचा डान्स

सुस्मिता वडतिले

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सध्या एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाण सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. नेटकरी या गाण्यावर लिप्सिंग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

नुकताच या गाण्याचा व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर जो ट्रेण्ड सुरु असतो तो रितेश नेहमी फाॅलो करतो. त्याने एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाणे ऐकले आणि त्या गाण्यावर व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करून रितेशने त्याला कॅप्शन दिले, ' या गाण्याच्या मी प्रेमात पडलोय. नारळ पाणी बाय, धृवन मोर्थी आणि प्रित बेर्डे.' या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून अनेक जणांनी कमेंट केल्या आहेत.

धृवन मोर्थी आणि प्रित बेर्डे या संगितकारांनी तयार केले. हे गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रितेश नेहमी नवोदित कलाकारांचे कौतुक करत असतो. या संगितकारांचे देखील त्याने कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला. संगितकार प्रित बेर्डेने रितेशचा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.

'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलीया आणि रितेशची ओळख झाली. जेनिलीया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 ला लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाचे दोन मुलं आहेत. धमाल , हाऊस फूल, बाघी 3, एक व्हिलन या हिट चित्रपटांमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच माऊली आणि लय भारी या मराठी चित्रपटामधून रितेशने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT