marathi actor Rohan Gujar Wife snehal battle with breast cancer  eSakal
मनोरंजन

Rohan Gujar Wife: "खुप सहन करावं लागतंय...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीची कॅन्सरशी झुंज

होणार सून मी या घरची मधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोची कॅन्सरशी झुंज

Devendra Jadhav

Rohan Gujar Wife Snehal Gujar Cancer News:

होणार सून मी या घरची मालिका सर्वांना आठवत असेलच. या मालिकेतील पिंट्याच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे रोहन गुजर. रोहन गुजर सध्या त्याच्या आयुष्यातील संघर्षाच्या परिस्थितीला सामोरा जात आहे. रोहनची बायको स्नेहलला कॅन्सरशी सामना करावा लागत आहे.

स्नेहलने सोशल मीडियावर हॉस्पीटलमधला फोटो पोस्ट करत तिला आलेला वेदनादायक अनुभव सांगितला आहे.

स्नेहल सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिते, "ऑगस्ट महिन्यात छातीत डाव्या बाजूला दुखणं सुरु झालं...हे दुखणं नवीन होतं... आधी कधीही अनुभवलं नव्हतं...पाठपुरावा करायचं ठरवलं आणि किचकट आजार surprise म्हणून समोर ठाकला... ‘स्टेज झिरो कॅन्सर’ (Ductal carcinoma in situ)...कॅन्सर च्या आधीची स्टेज...
 
२ मॅमोग्राम, बायोप्सी, सोनोलोकोलायझेशन, ३ नोव्हेंबर ला ब्रेस्ट कन्झर्वेशन (conservation) सर्जरी, आणि रेडिएशन अशा टप्प्यांतून उपचार सुरु आहेत..." (Latest Entertainment News)

स्नेहल पुढे लिहीते, "ह्या आजाराने मला पूर्ण पकडण्याआधीच मी त्याला एक टप्पा आऊट करू शकले याचं समाधान आहे... मनाला आणि शरीराला गेल्या महिन्याभरात खूप सहन करावं लागलंय...अजूनही लागतंय... संपूर्ण प्रक्रियेत मेंटल, इमोशनल ब्रेक डाऊनचे अनेक प्रसंग येतात...मला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आणि surgery नंतर पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा डोळ्यांना थांबवता नाही आलं...पण जखमांकडे, स्वतःच्या शरीराविषयी जागरूक असल्याची, या प्रसंगाला छान सामोरं गेल्याची खूण म्हणून पाहिलं की गोष्टी सोप्या होतात... त्या अजून सोप्या होतात जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं…या बाबतीत माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांना १०० गुण…कोणताच ड्रामा नाही, साध्या सोप्या पद्धतीने आहे ते accept केलं आणि वातावरण पूर्णपणे नॅार्मल ठेवलं….

"मीच का? माझ्यासोबतच का?" असे प्रश्न कटाक्षाने टाळायला हवेत... सहानुभूतीचा मोह आवरायलाच हवा... तरच विचारांत धैर्य, भावनांत स्थैर्य येऊ शकतं...’दिसतं तेच वास्तव’ या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार सुरु झालाय..." (Latest Marathi News)

स्नेहल शेवटी लिहीते, "या सगळ्या काळात जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या आजाराविषयी जीवघेणा आजार म्हणून जितकं अवडंबर माजवलं जातंय तेवढी जनजागृती नाही... अजूनही या विषयी सांगणं/ बोलणं आपण टाळतो... मुली/ महिला मॅमोग्राम करणं टाळतात, हे करणं का गरजेचं आहे त्या विषयीचा awareness कमी पडतोय... हा आजार अनुवंशिक ही असू शकतो हे मला या process मध्येच कळलं... पण त्या पलीकडेही हे बदलत्या जीवनपद्धतीचं, अवाजवी stress चं प्रतिबिंब आहे... हे विसरता काम नये...तणावापासून स्वतःला दूर ठेवणं ही तुम्ही स्वतःसाठी, आयुष्याप्रति दाखवलेली basic कृतज्ञता असेल...मीही अजून हे शिकतेचं आहे...

दसरा ते दिवाळी या १५ दिवसांत शरीरातून ही कॅन्सरची नकारात्मकता काढून टाकलेय… यंदा दिवाळीत योगायोगाने खूप दिवे गिफ्ट मिळाले… मी ते ‘तिमिरातून तेजाकडे’ याचं प्रतिक मानलेत… Radiation starts today…"

या पोस्टखाली अनेकांनी स्नेहलच्या खंबीरपणाचं कौतुक केलं असुन तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT