Prarthana Behere and Abhishek Javkar
Prarthana Behere and Abhishek Javkar  Instagram
मनोरंजन

लग्नाची गोष्ट : ‘कॉफी’ आणि ‘विकएण्ड’

सकाळ ऑनलाइन

प्रार्थना बेहेरे, अभिषेक जावकर

मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्यातील एक जण हा पडद्याच्या मागं महत्त्वपूर्ण काम करत आहे, तर दुसरा पडद्यावर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आपलेसे करत आहे. अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर. प्रार्थना बेहेरे हिचा चेहरा आपल्या सर्वांनाच परिचित आहे. आजच्या काळातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे, तर तिचा नवरा अभिषेक निर्माता, दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका उत्तमप्रकारे सांभाळत आला आहे. ‘मिसिंग ऑन विकएण्ड’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पाऊल टाकलं. आगामी काळातही तो काही वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित चित्रपट आपल्यासाठी घेऊन येणार आहे. प्रार्थना आणि अभिषेक या दोघांचं अरेंज मॅरेज आहे आणि लग्नासाठी जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी प्रार्थना एक अभिनेत्री आहे, इतकीच माहिती अभिषेकला होती. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले, विचार पटले आणि त्यांनी एकमेकांना होकार दिला. आता त्यांच्या लग्नाला साडेतीन वर्षं झाली आहेत.

अभिषेक आणि प्रार्थना यांचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. प्रार्थना अल्लड, तर अभिषेक शांत. अभिषेक म्हणाला, ‘‘प्रार्थना बेस्ट जोडीदार आहे. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट मी तिला सांगितलेली आहे. ती अतिशय अवखळ, बिनधास्त आणि मजा घेत आयुष्य जगणारी मुलगी आहे. छोट्या-छोट्या गोष्टी एन्जॉय करायच्या, प्रत्येक गोष्टीत आनंद मानायचा आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता स्वछंदीपणे आयुष्य जगायचं, हे तिनं मला शिकवलंय. तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो. ती एक उत्तम अभिनेत्री आहे तशीच चांगली कलाकारही आहे. एखादी वस्तू किंवा गोष्ट कलाकुसर करून ती आणखीन सुंदर कशी दिसेल याची प्रार्थनाला खूप चांगली जाण आहे आणि दरवेळी ती काही ना काही असं नवीन करत असते. मी निर्माता-दिग्दर्शक असल्यानं बऱ्याचदा धाडसी निर्णय घेतो. त्यात प्रार्थनानं मला नेहमीच साथ दिली आहे. ती कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. अशी आम्ही दोन विरुद्ध गुण असलेली माणसं असल्यामुळे आमच्यात असलेल्या गुणांची, आमच्या वेगवेगळ्या स्वभावांची एकमेकांबरोबर देवाणघेवाण करून आम्ही एकमेकांचं आयुष्य पूर्ण करतो असं मला वाटतं.’’ अभिषेकने प्रार्थनाचे सगळे चित्रपट पाहिले असून त्याला तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मस्का’, ‘व्हॉटस्अप लग्न’ या चित्रपटांत साकारलेल्या भूमिका विशेष आवडल्या आहेत.

हेही वाचा : ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल रॉयचा कोरोनाशी सामना; कुटुंबीयसुद्धा पॉझिटिव्ह

प्रार्थनानं अभिषेकबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘अभिषेकचा माझ्यापेक्षा विरुद्ध असलेला स्वभाव हीच गोष्ट मला भावली. मी मागचा पुढचा विचार न करता एखादी गोष्ट करणारी, काहीअंशी वेंधळी, खूप भावुक, कमी पेशंन्स असलेली, गप्पिष्ट मुलगी आहे. ज्या गोष्टी माझ्या स्वभावात नाहीत त्या सगळ्या अभिषेकमध्ये आहेत. तो अतिशय शांत, समंजस, समजूतदार, मितभाषी आहे. त्याची पेशन्स लेव्हल माझ्याहून कित्येक पटीने जास्त आहे. अभिषेक कमीत कमी शब्दात त्याचं म्हणणं परफेक्ट मांडतो. कामाच्या बाबतीत असो किंवा रोजच्या आयुष्यात; त्याला प्रत्येक गोष्ट नीटनेटकीच लागते. कामाच्या बाबतीत तो अत्यंत पॅशनेट आहे. तो त्याचं दोनशे टक्के देऊन काम करतो. वेळेच्या बाबतीत तो प्रचंड पर्टिक्युलर आहे. ठरलेल्या वेळात ठरलेली गोष्ट तो करतोच करतो. कामाच्या बाबतीतही तो मला नेहमीच पाठिंबा देत आला आहे. अनेकदा शूटमुळे घरच्या सणासमारंभाला मला उपस्थित राहता येत नाही. त्या प्रत्येक वेळी 'तू शूटिंग कर. काम आणि कमिटमेंट महत्त्वाची,’ असं त्याचं म्हणणं असतं. आणि मी लग्नानंतर आनंदी राहून चांगलं काम करू शकत्येय याचं हेच मुख्य कारण आहे.’’

अभिषेक आणि प्रार्थना यांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे असले तरी त्यांच्या आवडीनिवडी या कॉमन आहेत. दोघांनाही चित्रपट बघायला आवडतात, शांत ठिकाणी फिरायला जायला आवडतं, दोघेही खवैये आहेत. अशाप्रकारे हे खरोखर ‘मेड फॉर इच अदर’ कपल आहे, असंच म्हणावं लागेल.

(शब्दांकनः राजसी वैद्य)

संपादन- स्वाती वेमूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT