
Mumbai local Blast: मुंबई लोकल साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. २००६ मध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला. मुंबईत ११ जुलै २००६ रोजी ११ मिनिटात ७ स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.