Patla Tar ghya-Pushkar Sandeep pathak
Patla Tar ghya-Pushkar Sandeep pathak Google
मनोरंजन

OTT Show: बेडरुममध्ये पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या 'त्या' गोष्टी पुष्कर- संदीपनं बोलून दाखवल्या माध्यमांसमोर

प्रणाली मोरे

OTT Show: प्लॅनेट मराठीवर 'पटलं तर घ्या विथ जयंती' हा नवा चॅट शो सुरु झाला आहे. ज्याचे एकूण आठ भाग पहिल्या भागात रिलीज केले जाणार आहेत. याआधी या चॅट शो मध्ये सोनाली-आशय कुलकर्णी,अमृता खानविलकर-ओम राऊत आणि तेजस्विनी पंडित-अभिजित पानसे या जोड्या येऊन गेल्या.

आता नुकत्याच रिलीज झालेल्या भागात पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक ही जोडी धमाल करताना दिसत आहे. या भागात दोघांनी आपल्या करिअर सोबतच वैयक्तिक आयुष्यातीलही धमाल किस्से शेअर केले आहेत.

सध्या दोघांच्या एपिसोडचा एक प्रोमो भलताच गाजतोय ज्यात दोघांनी बेडरुम सीक्रेट्स शेअर केले आहेत. आता नेमकं दोघे कसे पोहोचले या मुद्द्यापर्यंत चला जाणून घेऊया.

पुष्कर आणि संदीपला शो ची होस्ट जयंतीनं प्रश्न विचारला की,'अशा कोणत्या लाइन्स आहेत ज्या आपण एक्झॅम हॉल आणि बेडरुममध्ये देखील बोलतो...', मग काय समोर दोन विनोदवीर बसले असताना दोघं सोडतात का संधी. दोघांनी अशी काही उत्तराची बॅटिंग सुरु केली की सगळे बेडरुम सीक्रे्टस ओपन करुन बसले ना राव..

सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो भलताच गाजतोय. आणि दोघांचा एपिसोडही आज रीलिज झाला आहे. प्लॅनेट मराठीवर हा शो आपण विनामूल्य पाहू शकणार आहात.

नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपितही या मुलाखतीत सगळ्यांसमोर उघड केलं आहे. खरं तर कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातही हे कलाकार फवल्या वेळात काय करतात, असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पुष्कर श्रोत्री यांनी याच रहस्याचा उलगडा प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये केला आहे.

पुष्कर हे फावल्या वेळात रिक्षा चालवायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. आता ते असं का करायचे, यामागचं मुख्य कारण काय? याचे उत्तर या खास भागातून मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT