Marathi movie bonus released their new poster
Marathi movie bonus released their new poster  
मनोरंजन

पूजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘बोनस’ सिनेमाचा नवा पोस्टर रिलिज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्याबरोबरच्या भागीदारीतून ‘बोनस’ हा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 28  फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं आहे. 

‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले असून या चित्रपटात मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे मध्यवर्ती भूमिकेत आहेत. पूजाचा या चित्रपटातील नवी लूक आता समोर आला आहे. य़ामध्ये अभिनेत्री पूजाचा कोळी वेशातील वेगळा लुक पोस्टरद्वारे तिच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात आला. 

निर्मात्यांनी या चित्रपटाची नायिका पूजा सावंतच्या वाढदिवशी एका टॅगलाईनसह चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये पूजा कोळी वेशात असून ती त्यात अत्यंत सुंदर दिसली आहे. ‘जग एकच आहे आणि आपण सगळे त्या एकाच जगाचा भाग आहोत’ या चित्रपटातील टॅगलाइनसह हे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 

‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि अर्जुन सिंग बरान व कार्तिक डी निशाणदार प्रस्तुत, गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स निर्मित आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा चित्रपट येत्या 28  फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT