Marathi movie Trijya plays in black night films festival in Europe
Marathi movie Trijya plays in black night films festival in Europe  
मनोरंजन

'त्रिज्या'चा युरोपीय 'ब्लॅक नाईट्स' फिल्म फेस्टिव्हलमध्ये डंका

वृत्तसंस्था

मराठी मातीत निर्माण झालेली 'त्रिज्या' जगभरातील फक्त 14 'अ' दर्जा असणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये दाखविली जाणार आहे. हा फेस्टिव्हल इस्टोनिया देशातल्या टॅलिन या शहरात 15 नोव्हेंबर 1 डिसेंबर या कालावधीत होत आहे. 78 देशातून येणाऱ्या 250 चित्रपटांतून युवा दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांची त्रिज्याची निवड करण्यात आली आहे. या फेस्टिव्हल साठी सुमारे 80000 सिनेरसिक हजेरी लावतात.

मराठी सिनेइतिहासात पहिल्यांदा मराठी सिनेमा या फेस्टिव्हल मध्ये दाखल झाला आहे. यापूर्वी चीन मधील शांघाय या शहरात झालेल्या 'एशियन न्यू टॅलेंट अॅवॉर्ड' फेस्टिव्हल मध्येही या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना, 'द हॉलिवूड रिपोर्टर' आणि 'स्क्रीन इंटरनॅशनल' या नामांकित समजल्या जाणाऱ्या मासिकांमधून त्रिज्या चे परीक्षण केले गेले आहे. सोबतच कान्स येथे झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्रिज्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हा या चित्रपटाची निर्मिती भारत आणि जर्मनी या देशांनी केली आहे. 
स्थलांतरित युवकाची कथा असलेली 'त्रिज्या'ने जागतिक सिनेविश्वास मराठी चित्रपटाची त्रिज्या वाढवलेली आहे.

'उदाहरणार्थ नेमाडे' सारख्या डॉक्यु फिक्शन फिल्म मुळे चर्चेत आलेले अक्षय इंडिकर या युवा दिग्दर्शकाचे नाव 'त्रिज्या' मुळे पुन्हा पूढे आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT