Marathi original web series Liftman is launched by ZEE5
Marathi original web series Liftman is launched by ZEE5  
मनोरंजन

'झी5' ची मराठी ओरिजिनल वेबसीरिज ‘लिफ्टमन’ प्रदर्शित

सकाळवृत्तसेवा

मुंबई - झी5 (ZEE5) या भारतातील भाषिक कंटेण्टच्या सर्वांत मोठ्या व सर्वसमावेशक मनोरंजन प्लॅटफॉर्मने आज 'लिफ्टमन' ही मराठी सिच्युएशनल कॉमेडी वेबसीरिज आपल्या मूळ कलेक्शनमधून प्रदर्शित केली. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेले भालचंद्र (भाऊ) कदम यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. काल (ता. 26 जुलै) प्रदर्शित झालेली ही मालिका भाऊंच्या खास शैलीमुळे हास्याची कारंजी फुलवणारी ठरेल. 

या मालिकेचे बहुतेक शूटिंग लिफ्टमध्ये झाले असून खाली-वर जाण्याच्या प्रवासात भाऊ आणि त्यांच्या विनोदबुद्धीचा सामना करावा लागलेली विविध व्यक्तिमत्व या मालिकेतून समोर येतात. भरीस भर म्हणजे त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये असताना लिफ्ट ब्रेक डाउन होऊन अडकून पडण्याची कल्पना तुम्ही करू शकता का? भाऊंचे विनोदाचे टायमिंग बघता, खो खो हसवण्याखेरीज दुसरे काही घडेल असे अपेक्षितच नाही. प्रेक्षकांना ओळखीच्या वाटतील अशा परिस्थितींच्या माध्यमातून लिफ्टमन लोकांच्या मानसशास्त्रात खोलवर जाते आणि निरनिराळे लोक एकाच परिस्थितीत कशा निरनिराळ्या प्रतिक्रिया देतात हे दाखवते.    

या मालिकेबद्दल भालचंद्र (भाऊ) कदम म्हणाले, “लिफ्टमनची संकल्पना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि झी5 सारखे माध्यमांचे नवीन मार्ग स्वत:ला आपसूक अशा कल्पक फॉरमॅट्सकडे कसे घेऊन जातात हे बघून मी रोमांचित झालो आहे. या मालिकेसह मी वेबच्या जगात शीर्षक भूमिकेद्वारे प्रवेश करत आहे. प्रवेशासाठी याहून अधिक चांगली संकल्पना मला निवडता आली नसती. आज सर्वकाही शब्दश: मोबाईलमुळे एखाद्याच्या हाताच्या बोटांवर आहे आणि अशा परिस्थितीत मागे राहून कसे चालेल?”

झी5 चे बिझनेस प्रमुख मनीष अगरवाल म्हणाले, “मराठी भाषक प्रेक्षकांची मनोरंजनाची जाणीव किती विकसित आहे हे आपल्या रंगभूमी व चित्रपटांच्या समृद्ध वारशातून दिसून येते. विनोद, समृद्ध संकल्पना, आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा आणि या क्षेत्रातील प्रख्यात कलावंत हे सगळे काही लिफ्टमनमध्ये आहे. मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आज भाऊ कदम हे नाव अनेक अंगांनी विनोदाला समानार्थी म्हणून घेतले जाते. आमच्या सहज येता-जाता बघण्याजोग्या ८-१० मिनिटांच्या छोट्याशा विनोदी वेब मालिकेतील लिफ्टमनची भूमिका त्यांनी निवडली याचा मला आनंद वाटतो.”

२६ जुलैला सुरू झालेली लिफ्टमन ही १० भागांची वेब मालिका आहे. प्रत्येक भाग ८-१० मिनिटांचा असून, प्रेक्षकांना वन लाइनर्स आणि विनोदांनी भरलेल्या गमतीशीर लिफ्टसफरीला तो घेऊन जाईल. झी5 अॅप गूगल प्ले स्टोअरमधून http://bit.ly/zee5 आणि आयओएस अॅप स्टोअरवरून http://bit.ly/zee5ios डाउनलोड करता येईल. www.zee5.com वरही ते प्रोग्रेसिव्ह वेब अॅप (पीडब्ल्यूए) म्हणून उपलब्ध आहे. तसेच अॅपल टीव्ही व अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिकवरही उपलब्ध आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT