marriage function nach re mora nach dance viral on social media dancer look and dance engaged to audience  
मनोरंजन

नवरदेवासमोर नाचणारा मोर पाहिलात का?; व्हिडिओ झाला व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ट्रेडिंग राहताना दिसत आहेत. त्या व्हिडिओनं युझर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आजकाल सोशल मीडियातून चर्चेत राहायला प्रत्येकाला आवडते. त्यामुळे पोस्ट करणे, त्याचे लाईक्स आणि कमेंटस पाहणे हा नवीन फंडा तरुणाईचा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन सरपंच म्हणून डान्स करणा-या काकूंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला लाखो व्ह्युज आणि लाईक्स मिळाले. अक्षय कुमारच्या बाला या गाण्यावर त्यांनी केलेला डान्स सुपरहिट झाला होता. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. नवरदेवाच्या समोर नाच रे मोरा आंब्यांच्या बनात नाच, या गाण्यावर एक तरुण नाचत आहे. त्याचा तो डान्स एवढा भन्नाट आहे की त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या मिरवणूकीमध्ये इतर जे कोणी नाचत आहेत त्यांनीही आपले नाचणे थांबवले जेव्हा त्याचा डान्स सुरु होता.

साधारण एक ते दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या व्हाट्स अपच्या स्टेटसला ठेवला आहे. कित्येकांनी फेसबूक, इंस्टावर तो पोस्ट केला आहे. यामुळे मात्र नवरदेवाच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली आहे. त्यानंही आपल्या मित्राच्या डान्सचे कौतूक केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

मागील आठवड्यात एका गावातील लहान मुलांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातील एक मुलगा दुस-या मुलाला शिव्या देताना ए शंकरपाळ्या असे म्हणतो. हा व्हिडिओ तुफान लोकप्रिय झाला होता. त्याच्या पाठोपाठ नाच रे मोराचा हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

SCROLL FOR NEXT