Milind Gunaji's son 
मनोरंजन

मिलिंद गुणाजींच्या 'अभिषेकचं' लग्न: फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांचा मुलगा अभिषेक गुणाजी (Abhishek Gunaji) याने त्याची दीर्घकाळची मैत्रीण राधा पाटील (Radha Patil) सोबत शुक्रवारी एका मंदिरात लग्न केले. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेक आणि राधा यांचे मालवण येथील वालावल येथे स्वर्गीय वातावरण असलेल्या मंदिरात खाजगी लग्न झाले. या लग्नाला जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होती.

Milind Gunaji's son

मिलिंदने एक विधान शेअर केले ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “एक कुटुंब म्हणून आपण आपली संस्कृती आणि वारसा जपतो. त्यामुळे आम्ही वालावल (Walaval), मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले. मी नेहमीच आपल्या लँडस्केप्स, किल्ल्यांचे पुनर्वसन आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) पर्यटनामध्ये भारतीय वारसा आणि सौंदर्याचा प्रचार केला आहे. लग्न पारंपारिक पद्धतीने व्हावे अशी आमची इच्छा होती. आम्हाला एक मजबूत संदेश द्यायचा होता की महाराष्ट्रातील डेस्टिनेशन्स भारतातील इतर डेस्टिनेशन वेडिंग (Destination weddings) लोकेशनपेक्षा अतुलनीय आहेत.”

Milind Gunaji's son

अभिषेक हा आय.टी. इंजीनियर (IT Engineer) असून तो चित्रपट आणि चित्रपट निर्मितीच्या (Film production) कलेच्या प्रेमात पडला होता. त्याची पत्नी राधा ही मुंबईत असून ती फार्मा उद्योगात काम करतात. अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन (Sumeet Raghavan) आणि मिलिंद गुणाजी अभिनीत 'छल' (Chhal) हा लघुपट (shortfilm) दिग्दर्शित केला आहे आणि तो व्यावसायिक जाहिरातींसाठी (commercial ads) देखील काम करत आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Berlin film festival) नामांकन मिळाले.

Milind Gunaji's son

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT