Mimi Chakraborty Instagram
मनोरंजन

Mimi Chakraborty: फ्लाइटमध्ये मिमी चक्रवर्तीच्या जेवणात सापडलं..अभिनेत्रीचा संताप अनावर

दुबईच्या आमीरात कंपनीनं मेल करुनही तक्रारीची दखल न घेतल्यानं मिमी चक्रवर्तीनं आता ट्वीट करत त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

प्रणाली मोरे

Mimi Chakraborty: अभिनेत्री आणि तृणमुल कॉंग्रेस सांसद मिमी चक्रवर्ती सध्या विमानात मिळणाऱ्या जेवणावर भलतीच भडकली आहे. तिच्या जेवणात म्हणे लांबलचक केस तिला मिळाल्यानं सध्या तिचं डोकं गरम झालंय.

अभिनेत्रींन या प्रकरणात अमीरात एअरलाइन्सला एक लांबलचक मेल पाठवला आहे. ज्याचं काही उत्तर तिला आलं नाही म्हणून तिनं ट्वीट केलं आहे. मिमी चक्रवर्तीनं अमीरात एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

मिमी चक्रवर्तीने जेवणाचे काही फोटो सोशल मीडिया पोस्टवर शेअर केले आहेत.(Mimi Chakraborty complains of hairs in emirates airlines flight meal)

मिमी चक्रवर्तीनं जेवणाचा फोटो ट्वीट करत लिहिलं आहे की, ''प्रिय अमीरात..मला वाटतं की तुम्ही खूप मोठे झाला आहात..इतके की आता तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांची चिंताच उरली नाही. माझं म्हणणं आहे की जेवणात केस मिळणं ही किती किळसवाणी गोष्ट आहे. मी तुमच्या टीमला मेल केला पण त्याबदल्यात काहीच रिप्लाय नाही,ते तुम्हाला गरजेचं वाटलं नाही बहुतेक, केस माझ्या चपातीमधनं निघाला..जी मी खात होते. जर तुम्हाला या गोष्टीची पर्वा असेल तर सगळ्या डिटेल्ससोबत माझा मेल चेक कराल''.

माहितीसाठी इथं सांगतो की आमीरात एअरलाइन्स दुबईची इंटरनॅशनल एअरलाइन्स आहे जी आपल्या शानदार सर्व्हिससाठी ओळखली जाते. या कंपनीच्या फ्लाइटची तिकीट खूप महाग असते म्हणूनच प्रवासी देखील त्यांच्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा ठेवतात.

त्यामुळेच आता टीएमसी सांसद मिमीसोबत जी घटना घडली त्यानंतर फ्लाइटमधील सर्व्हिसेस आणि प्रवाशांसोबतचा कंपनीचा व्यवहार यावर प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT