Ameya Khopkar,Atif Aslam 
मनोरंजन

Ameya Khopkar: "पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच!"; मनसेचं ओपन चॅलेंज!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ameya Khopkar: प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम (Atif Aslam) हा लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, आतिफ अस्लम हा LSO90 या बॉलिवूडमधील चित्रपटातील गाणं गाणार आहे. पण आता आतिफच्या बॉलिवूडमधील कमबॅकला मनसेविरोध करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अमेय खोपकर यांचे ट्वीट

अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "आतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलिवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा-पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलिवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय."

अमेय खोपकर यांनी याआधी देखील पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपटांबाबत वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यावर मनेसनं विरोध दर्शवला होता. ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाचा विरोध देखील अमेय खोपकर यांनी केला होता.

आतिफ अस्लमच्या गाण्यांना मिळते प्रेक्षकांची पसंती

आतिफ अस्लमच्या गाणी प्रेक्षक अवडीनं ऐकतात. आतिफनं अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी गायली आहे. अजब प्रेम की गजब कहानी या हिंदी चित्रपटातील "तू जाने ना" हे गाणं आतिफनं गायलं आहे. तसेच त्याच्या तेरा होने लगा हूं , दिल दियां गल्लां,तू मोहब्बत है या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता आतिफ अस्लम बॉलिवूडमध्ये कमबॅक करु शकणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT