mns party and ameya khopkar oppose to pakistani artist and films  fawad khan Pakistani Film Controversy
mns party and ameya khopkar oppose to pakistani artist and films fawad khan Pakistani Film Controversy sakal
मनोरंजन

Pakistani Film Controversy: पाकिस्तानी कलाकार आणि चित्रपटाबाबत मनसेचा आक्षेप का आणि कशासाठी?

नीलेश अडसूळ

मराठीच्या सन्मानाची गुढी घेऊन निघालेल्या (मनसे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वाकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या काही दिवसात मनसे हिंदुत्वाबाबत चांगलीच आक्रमक झाली आहे. मग तो राम मंदिर भेटीचा मुद्दा असतो किंवा हनुमान चालीसा.. मनसेचा हा बदललेला चेहरा आपल्या कामांतूनही व्यक्त होत आहे. त्यामुळे हिंदुत्वाची कास धरलेल्या मनसेने आता पाकिस्तानी कलाकारांना चांगलेच धारेवर धरले आहे.

कलेला कसल्याही सीमा नसतात असं म्हणतात,त्यातही मनसे हा कलाप्रेमी पक्ष आहे. मग हा विरोध का आणि कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो. तर गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण काहीसे तणावपूर्ण राहिलेले आहे. भारतीय कलाकारांचा सन्मान पाकिस्तानात केला जात नाही. शिवाय त्यांचे कलाकार आपल्या देशात येऊन मोठे होतात, तरीही त्यांना भारतविषयी प्रेम दिसत नाही. शिवाय दोन देशांमध्ये संघर्षाची भावना असल्याने त्यांच्या कलाकारारांनी इथे येण्यास मनसेचा तीव्र विरोध आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

केवळ आताच नाही तर याआधीही मनसेने पाकिस्तानी गायकांना, विनोदवीरांना इथे येण्यास मज्जाव घातला होता. पण सध्या मनसे अधिकच आक्रमक झालेली दिसते. काही दिवसांपूर्वीच मनसेने बॉलीवुडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना आणण्याचा घाट जातला होता, त्यावेळी बॉलीवूडकरांनाही मनसेने इशारा दिला होता. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्विट केले होते. ज्यामध्ये ते म्हणाले होते, 'बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. असं कानावर येतंय, ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावी लागते. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फाटक मुंबईच काय हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतील कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील’ असे त्यांनी म्हटले होते.

तर आता फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची तयारी सुरू होती. हा बेतही मनसेने हाणून पडला आहे. ''फवाद खानचा ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही.'' अशी भूमिका आता मनसेने घेतली आहे. तर यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT