Mugdha Godbole Ranade: अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडेनं (Mugdha Godbole Ranade) नुकतेच फेसबुकवर काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. हे स्क्रिनशॉट्स शेअर करुन मुग्धानं तिच्यासोबत घडलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नाचं संपूर्ण प्रकरण सांगितलं. अशातच आता मुग्धाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुग्धासोबत घडलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नाचं नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात...
मुग्धानं पोस्टमध्ये लिहिलं, "5 फेब्रुवारी ला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉड चा प्रयत्न. मी दुसऱ्या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अश्यात मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले आहेत ते पैसे मी तुमच्या अकाऊंट वर परत जमा करावेत. 12,500 रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं. पुढे त्याने आधी 10,000 रुपये transfer केल्याचा मेसेज आला आणि मग 25000 रुपये पाठवल्याचा मेसेज आला. त्याच वेळी माझ्या gpay अकाऊंट वरही मेसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं. आणि मग तो म्हणू लागला की, मी चुकून 2,500 च्या ऐवजी 25,000 ट्रान्स्फर केले आहेत तर कृपया ते परत करा."
"मधल्या काळात मी नवऱ्याशी संपर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाहीये. एकीकडे ह्या माणसाचे सतत फोन येत होते. आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला ओरडले. पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नवऱ्याने त्याला आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंट चा स्क्रीन शॉट मागवला. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे.", असंही मुग्धानं पोस्टमध्ये लिहिलं.
पुढे मुग्धानं पोस्टमध्ये लिहिलं, "माझ्या सुदैवाने मी ह्याला बळी पडले नाही. पण ह्याकडे लक्ष द्या. रोज नवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. ह्यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरा समोर नसू ह्याचाही कदाचित अंदाज होता. डोळे कान आणि मेंदू 24 तास चालू ठेवणं ह्याला आता पर्याय उरलेला नाही."
मुग्धानं ठिपक्यांची रांगोळी,सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.