naeem qureshi Dance in Farm goes Viral and original Singer milind gaba Reacted on this video  SAKAL
मनोरंजन

Viral News: शेतातील डान्सचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की मूळ गायकापर्यंत तो पोहोचला, मग पुढे घडलं असं काही की...

एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की मूळ गायकापर्यंत तो व्हिडीओ पोहोचला. मग पुढे काय घडलं ते वाचा

Devendra Jadhav

Viral News of Naeem Qureshi: सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर सतत चर्चेत राहण्यासाठी सध्याची पिढी हवं ते करत असते. कुठे डान्स कर, कुठे अभिनय, कुठे गाणं कर कुठे कॉमेडी व्हिडीओ बनव. अशा अनेक माध्यमातून सध्याची पिढी आपण चर्चेत कसे राहू आणि व्हायरल कसे होऊ यासाठी प्रयत्नात असते.

पण तुम्ही ज्या गाण्यावर डान्स करताय त्या गाण्याच्या मूळ गायकापर्यंत तुमचा व्हिडीओ पडल्यावर पुढे काय होईल, याची कल्पना कधी केलीय? जाणुन घ्या हा गमतीशीर किस्सा

एक डान्स व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की...

ही गोष्ट नईम कुरेशी या तरुणाची. नईम हा एक इन्फ्लुएन्सर आणि व्हिडीओ क्रिएटर आहे. नईमने काही महिन्यांपुर्वी एक डान्स रील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत नईन शेतालगत असलेल्या कच्च्या पायवाटेवर डान्स करताना दिसत आहे.

'दिन विच तेरे लिए टाइम कड़ के, करदा मैं प्रॉमिस मिलन आऊंगा' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं आणि या गाण्यावर नवीनने केलेला डान्स इतका व्हायरल झाला की अनेकांनी या गाण्याचा वापर करुन स्वतःचे रील व्हिडीओ बनवले.

गाण्याच्या मूळ गायकापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आणि मग पुढे

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की गाण्याचे मूळ गायक मिलिंद गाबापर्यंत पोहोचला. मिलिंद गाबा हे प्रसिद्ध गायक, गीतकार आणि निर्माते आहेत. २०१९ ला मिलिंद गाबाने गायलेल्या "शी डोन्ट नो" या गाण्यातील ओळी नईमने डान्स करताना वापरला.

मिलींद यांच्यापर्यंत हा डान्स व्हिडीओ पोहोचला. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करुन खाली कॅप्शन लिहीलं की, "इन्स्टाग्रामवर #SheDontKnow वर 1.1 मिलीयन व्ह्यूज असलेला रील बनवला गेलाय. या व्यक्तीशी मला संपर्क साधून द्या. मला त्याला नवीन काळी जीन्स भेट द्यायची आहे, जी त्याला नक्की मोठी होईल."

व्हायरल झालेला हा डान्सर कोण आहे?

नकळत व्हिडीओ व्हायरल झालेला हा या व्हिडीओ क्रिएटरचं नाव नईम कुरेशी हे आम्ही सांगितलंच. नईमचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ टिक - टॉकच्या काळचा आहे. लोकांनी पुढे नईमचं अकाऊंट शोधून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला.

नईमने सुद्धा लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघून एका नवीन लूकमध्ये पुन्हा एकदा त्याच गाण्यावर रील बनवला. या नवीन व्हिडीओला सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT