Navwari Marathi Song
Navwari Marathi Song esakal
मनोरंजन

Navwari Marathi Song : 'नको बंगला, नको गाडी फक्त नऊवारी पायजे'!

युगंधर ताजणे

Navwari Pahihe Marathi Song Viral Social media : महाराष्ट्रातील धानवड तांडा येथील तरुण त्याच्या बाप्पाच्या भक्ती पोटी आणि बाप्पाच्या गाण्याने केलेल्या करिअरच्या सुरुवातीने तो संपूर्ण भारतभर पोहोचला आहे. असा हा गायक, संगीतकार, गीतकार म्हणजे संजू राठोड. संगीत क्षेत्रात येण्याआधी कोणताही वारसा नसताना संजूने स्वमेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख तयार केली.

संजूच्या लोकप्रिय झालेल्या गाण्यांना संजूच्या स्वप्नांना सत्यात उतरवलं. सध्या सोशल मीडियावर 'नऊवारी' या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्याचा गायक, संगीतकार दुसरं तिसरं कोणी नसून संजू राठोड आहे. काही दिवसांतच या गाण्याने मिलिअन प्रेक्षकांची मने जिंकली.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

‘नऊवारी’ अगोदर ‘डिंपल’, ‘देव बाप्पा - बाप्पावाला गाणा’, ‘स्टाईल मारतंय’ या गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. प्रत्येक गाण्याचा १ मिलिअनचा आकडा पार करायचाच, हा हेतू समोर ठेवून आजवर संजूने गाणी तयार केली आणि त्याच्या यशाचा आलेख बघता संजूचा हा हेतू पूर्ण ही झाला आहे. त्याच्या कलेचं आणि जिद्दीचं चीझ झालं असं बोलणं यावेळी वावगं ठरणार नाही.

मिलियन व्यूजचा टप्पा पार करणं हे काही संजूसाठी सोप्प नव्हत. सुरुवातीच्या काळात संजूनेही बराच स्ट्रगल केला. गाणी बनवण्यात मधल्या काही काळात खंड ही पडला मात्र बाप्पाच्या कृपेने, गणेशोत्सवात पुन्हा एकदा ‘देव बाप्पा - बाप्पावाला गाणा’ हिट झालं. प्रेक्षकांपासून ते प्रसिध्द कलाकारांपर्यंत, सर्वांनी या गाण्यावर रिल्स केले. संजूच्या आजवरच्या प्रवासात त्याला त्याच्या भावाची अतिशय मोलाची साथ मिळाली.

२० वर्षीय, संजूचा भाऊ गौरव राठोड (जी स्पार्क) याच्या सोबतीने दोघांनी एकापेक्षा एक मराठी गाणी तयार केली. शिवाय संजू आणि गौरव राठोड सोबत प्राजक्ता घाग, मनिष महाजन आणि ‘नऊवारी’ गाण्याच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीने तयार झालेल्या या गाण्याने 20 मिलिअनचा टप्पा पार केला आहे तर स्पॉटिफाय या ऑडियो प्लॅटफॉर्मवर 1 मिलिअन स्ट्रीम्स मिळाले आणि इंस्टाग्रामवर 400K पेक्षा जास्त लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणं सध्या ट्रेंडिंगवर आहे.

गाणी तयार करणं हे संजूचं पॅशन आहे. संजूच्या या पॅशनला, ‘बिलिव्ह आर्टिस्ट सर्व्हिसेस' कंपनीची साथ मिळाली आणि त्याचा पुढील प्रवास त्याच्या मनाप्रमाणे सुरु झाला. संजूच्या ‘नऊवारी’ गाण्याने तर खरंच कमाल केली. प्रेक्षकांची मागणी पाहता लवकरच या गाण्याचं फिमेल व्हर्जन देखील येणार आहे. तसेच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ‘बुलेटवाली’ हे संजूचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात ‘बुलेटवाली’ हे गाणं देखील मिलिअन व्ह्युजचा प्रवास करणार एवढं मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT