गुरू असावा तर असा! बाईंची बदली झाली, विद्यार्थ्यांना कोसळले रडू | Video Viral

हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Video Viral
Video ViralSakal

आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरूपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. तर या पौर्णिमेला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या जीवनात एक तरी गुरू असतोच. आईवडील हे आपल्या जीवनातील पहिले गुरू असतात. त्यानंतर येणारे गुरूही आपल्याला आयुष्यात मोठं मार्गदर्शन करत असतात.

Video Viral
NCP-Shivsena : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्धव ठाकरें गटाचा 'एकला चलो'चा नारा; मविआतून पडणार बाहेर?

सध्या एका शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका शाळेतील शिक्षिका कामावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थिनींना रडू आवरलं नाही. विद्यार्थिनींच्या जीवनातील एक गुरू म्हणून त्यांनी काम केल्यानंतर त्या आता निवृत्त होत असताना शिष्याला रडू कोसळलं आहे.

दरम्यान, या विद्यार्थिनी शिक्षिकेच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहेत. शिक्षकांची बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ हा सर्वांसाठीच एक भावनिक क्षण असतो. शिक्षक बदली होऊन जात असताना प्रत्येक गावामध्ये भावनिक वातावरण तयार होते आणि विद्यार्थी सुद्धा लाडक्या शिक्षकाला निरोप देताना रडतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com