Onkar Bhojane excusive interview on sakal digital he said My bond with Hasya jatra is still strong
Onkar Bhojane excusive interview on sakal digital he said My bond with Hasya jatra is still strong sakal
मनोरंजन

Onkar Bhojane: 'हास्यजत्रे'शी माझं नातं आजही तितकंच घट्ट.. 'त्या' चर्चांवर ओंकार जरा स्पष्टच बोलला..

नीलेश अडसूळ

Onkar Bhojane on Maharashtrachi Hasya jatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने.

तो सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे. हास्यजत्रामधील त्याची यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट.. यामुळे त्याचे कौतुकही झाले आणि टीकाही. पण तो मागे हटला नाही.. 'हौस आकाशी उंच उडायची' म्हणत त्याने झेप घेतली आणि 'सरला एक कोटी'सारखा दमदार चित्रपट केला.

एवढेच नाही तर आता तो 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून 'हाऊसफुल्ल'च्या पाट्या झळकत आहेत. याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्याने ''महाराष्ट्राची हास्यजत्रा'' बाबत एक मोठा खुलासा केला.

(Onkar Bhojane excusive interview on sakal digital he said My bond with Hasyajatra is still strong)

ओंकारला खरी ओळख मिळाली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून. या कार्यक्रमावर आणि प्रेक्षकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्याने साकारलेली अनेक पात्रं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मग ते मामा असो, वायरमन असो, ज्योतिषी किंवा अगं अगं आई करत येणारा मुलगा.. ओंकारने अक्षरशः धुमाकूळ घातला.

पण नंतर अचानक ओंकारने हा सोडला आणि 'फू बाई फू' मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याच्यावर सडकून टीका झाली . अनेकांनी त्याला नको नको त्या शब्दात बोल लावले, आरोप केले. पण ओंकारने कायमच त्यावर बोलणे टाळले. पण सकाळच्या मुलाखतीत मात्र तो 'हास्यजत्रे'विषयी स्पष्टच बोलला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तू हास्यजत्रेतलं काय मिस करतोस.. असं सकाळ डिजिटलच्या मुलाखतीत विचारलं. त्यावर ओंकार म्हणाला, ',मी सगळ्यांनाच मिस करतो. कारण आमची छान बॉंडिंग झाली होती. हास्य जत्रेनं मला खूप काही दिलं. सचिन मोटे सर, गोस्वामी सर सर्वांकडूनच खूप काही शिकलो. काही कारणास्तव मी तिथून बाहेर पडलो असलो तरी माझं नातं आजही त्या शो शी तितकंच घट्ट आहे. मी आजही आवर्जून प्रेक्षक म्हणून हास्यजत्रा पाहतो. त्यामुळे ते बंध आजही तसेच आहेत' असं ओंकार या मुलाखतीत म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT