Pankaj Udhas Songs
Pankaj Udhas Songs  esakal
मनोरंजन

Pankaj Udhas Songs : रिक्षा असो किंवा मर्सिडिज प्रत्येकाला हळवा करणारा आवाज, पंकज उधास यांच्या १० गझल

Pooja Karande-Kadam

Pankaj Udhas Songs :

चिठ्ठी ना कोई संदेश, और आहिस्ता किजिए बाते, यांसारखी अनेक गाणी आजच्या पिढीचीही फेव्हरेट आहेत. ही गाणी ज्यांनी गायलीत तो आवाज आज हरपला आहे. गझलकार पंकज उदास यांचे निधन झाले आहे. पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी (pankaj Udhas death news) देण्यात आली आहे.

त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले (pankaj udhas song) आहे की, ते बऱ्याच दिवसांपासून एका दुर्धर आजाराचा सामना करत असल्याचे कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे.

पंकज उदास यांची अनेक गाणी आजही आजरामर आहेत. काळ पालटला असला तरी देखील ती गाणी आजही काळजाला भिडतात. आज आपण त्यांची काही गाणी पाहुयात.  

१ .‘और आहिस्ता किजीए बातें’

पंकज उदास यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांचे ‘और आहिस्ता किजीए बातें’ हे गाणे तर कल्पने पलिकडली लव्ह स्टोरी सांगते. एका भारतीय मुलीची परदेशातील एका मुलासोबत ओळख होते, त्याला इडियन कल्चर आवडतं. अन् तो तिला साडी देऊन लग्नाची मागणी घालतो. हे गाणं ९० च्या दशकातील गोल्डन स्टोन ठरले असेल यात शंका नाही. (Pankaj Udhas Songs)

२. ना कजरे की धार ना मोतियो के हार फिरभी तूम कितनी सुंदर हो!

लग्नाच्या प्रत्येक व्हिडिओत नवरीचा श्रृंगार सुरू झाला की हेच गाणं लागतं. ते म्हणजे पंकज जींच्या आवाजातलं ‘ना कजरे की धार ना मोतियो के हार फिरभी तूम कितनी सुंदर हो!’

३. जीए तो जीए कैसे बिन आपके

एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीला प्रपोज करण्याचा विचार करत असतो तेव्हा हमखास या गाण्याची आठवण येते. जेव्हा तिला पटवून द्यायचं असतं की, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तेव्हा पंकज जींचे हे गाणे आठवते ‘जीए तो जीए कैसे बिन आपके’

४. चिठ्ठी आई है

भारताच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी चिठ्ठी आई है ही अजरामर गझल त्यांनी गायली. ज्यात आपल्या घरापासून दूर असलेल्या लोकांच्या भावना त्यांनी अनमोल शब्दात व्यक्त केल्या आहेत

५. वो लडकी जब घर से बाहर निकलती है!

प्रेमात पडलेल्या व्यक्तीची आतुरतेनं वाट पाहणारं प्रेम त्यांनी या गीतातून दाखवलं आहे

६ .खुदा करे की महोब्बत में वो मकाम आये!

सतत माझ्या ओठांवर प्रियसीचेच नाव रहावे, अशी मागणी देवाकडे करणारा एक प्रियकर या गाण्यातून आपल्याला भसतो.

७.छुपाना भी नही आता, जताना भी नही आता

९० च्या दशकातील अनेक लोकांचे हे गाणे फेवरेट होते. कारण ज्यात प्रेम असूनही व्यक्त न करणे किती त्रासदायक ठरू शकतं हे पंकजजींनी दाखवलं आहे.

८. आज फिर तूम पे प्यार आया है!

माधूरी दिक्षित आणि विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे रोमँटीक गाणं होतं, आज फिर तूम पे प्यार आया है!

९. थोडी थोडी पिया करो

तुम्ही चित्रपटात सर्रार पाहिलं असेल की लोक दु:ख विसरण्यासाठी मद्यपान करतात. पण या गझलमध्ये पंकज यांनी तुम्ही कितीही प्या पण त्याचा हिशोब ठेवा, असे सांगितले आहे.

१०. मत करना इतना गुरूर

मत करना इतना गुरूर की हम तेरी सादगी पे मरते है! अशा साध्या अन् सोप्या शब्दात पंकजजी प्रेमाला बांधून ठेवतात. खरंच आपलं भाग्य थोर की असे गायक आपल्याला लाभले. अन् त्यांची ही अजरामर असलेली गाणी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT