Police arrested this actor for dancing outside shahrukh and salman houses
Police arrested this actor for dancing outside shahrukh and salman houses 
मनोरंजन

अभिनेत्याला पोलिसांनी पकडले, सलमान-शाहरुखच्या बंगल्यासमोर करत होता डान्स

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवनवीन कलाकारांची एन्ट्री होतेय. काही कलाकार स्वत:च्या सिबलिंग म्हणजेच भाऊ बहिणींनादेखील बी-टाउनमध्ये आणण्याची तयारी करत आहेत. कॅटरीना कैफची बहिण इसाबेला, आयुष्मान खुरानाचा भाऊ अपेक्षित खुराना आणि अशा अनेक कलाकारांची भावंड बी टाऊनमध्ये येत आहेत. बॉलिवूडचा सध्याचा टॉपचा आणि चाहत्यांमधील सेंसेशन विकी कौशलचा भाऊही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण चित्रपट येण्याआधीच त्याला पोलिसांनी पकडलं आहे. 

विकी कौशला भाऊ सनी कौशल लवकरच बी-टाऊनमध्ये पदार्पण करणार आहे. 'भांगडा पा ले' या चित्रपटातून तो झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रुखसार डिल्लन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सनी त्याच्या या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त आहे. बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहमीच काहीतरी  वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतं.

सनीने प्रमोशनसाठी अशीच एक युक्ती लढवली. सनी आणि अभिनेत्री रुक्सार प्रमोशनसाठी थेट सलमान आणि शाहरुख खानच्या बंगल्यासोबत पोहोचले. त्यांच्या घराबाहेर पोहोचले आणि चित्रपटावरील गाण्यांवर डान्स केला. ही टीम डान्स करत असताना तिथे भरपूर गर्दी जमली. जमलेली गर्दी हटवण्यासाठी पोलिस तिथे पोहोचले. पोलिस रुक्सार आणि सनीला पकडून घेऊन जातात. या सर्व प्रकराचा व्हिडीओ फोटोग्राफर विराल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

हे अनोख्या पद्धतीचं प्रमोशन चाहत्यांनी पसंत केलं आहे. शाहरुखचा बंगला 'मन्नत' आणि सलमानचा 'गॅलेक्सी' चाहत्यांचं आकर्षण आहे. त्याच्या बाहेर डान्स करत प्रमोशन करण्याचा आगळा वेगळा प्रयत्न सनी आणि रुक्सारने केला. 'भांगडा पा ले' हा चित्रपट नवीन वर्षी म्हणजेच 3 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT