prajakta mali
prajakta mali  esakal
मनोरंजन

मुंबई पोलिसांनो तुमचे आभार; प्राजक्ताचा व्हिडीओ

प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.(prajakta mali) तिच्या अभिनय आणि नृत्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून प्राजक्ताने मुंबई पोलिसांबद्दल (Mumbai Police) कृतज्ञता व्याक्त केली आहे.(prajakta mali thanked Mumbai Police and shared a special video)

तौक्ते चक्रिवादळामुळे मुंबईमधील किनारपट्टी लगतच्या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. या पावसात रस्त्यावरील ट्रॅफिक मॅनेज करतानाचा एका मुंबई पोलिसाचा व्हिडीओ प्राजक्ताने शेअर केला. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले, 'मुंबई पोलिस, कृतज्ञता.' प्राजक्ताच्या या खास व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी या व्हिडीओसला कमेंट करून दिवसरात्र आपल्या जिवाची परवा न करता नागरिकांसाठी काम करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आहेत. प्राजक्ताच्या या व्हिडीओला 900 पेक्षा जास्त जणांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करून लिहीले, 'सलाम या पोलिसाला', तर एकाने लिहीले,' ते खूप चांगले काम करत आहेत. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे.' एका यूजरने लिहीले , 'शब्द नाहियेत या देव माणसासाठी'

प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या विविध लूकमधील फोटोशूटचे फोटो ति सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. सोशल मीडियावर हा खास व्हिडीओ शेअर केल्यामुळे प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT