Praveen Kumar Google
मनोरंजन

केवळ 'भीम' म्हणूनच नाही तर प्रविण कुमार 'या' कामगिरीमुळेही ओळखले जायचे

वयाच्या ७४ व्या वर्षी आजारपणामुळे त्यांचं निधन झालं आहे.

प्रणाली मोरे

बी.आर.चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत भीमाची व्यक्तिरेखा साकारलेले अभिनेता प्रविण कुमार(Praveen Kumar Sobti) यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रविण कुमार हे बऱ्याच दिवसांपासून अनेक व्याधींनी ग्रस्त होते आणि त्यांना शेवटच्या दिवसांत आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता. प्रविण कुमार यांनी केवळ अभिनय क्षेत्रातच नाही तर क्रिडाक्षेत्रातही आपलं नाव कमावलं होतं.आपल्या भारदस्त व्यक्तीमत्त्वामुळे ते आपल्या मित्रांमध्ये प्रसिद्ध होते. ते अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम अॅथलिट देखील होते. हैमर आणि डिस्क थ्रो मध्ये त्यांनी कितीतरी पदक जिंकले होते. प्रवीण कुमार यांनी आशियाई खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं. हॉंगकॉंग मध्ये झालेल्या आशियाई खेळांमध्ये त्यांनी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले होते. त्यांनी १९६० आणि १९७० च्या दरम्यान अॅथलेटिक्स खेळांच्या माध्यमातून खूप लोकप्रियता मिळवली होती.

Praveen Kumar Sobti

एशियन गेम्स आणि ऑलम्पिक अशा खेळांमध्ये त्यांनी चांगलं प्रदर्शन केल्यामुळे बी.आर.चोप्रा देखी त्यांच्या प्रेमात होतेच. भीम या व्यक्तिरेखेसाठी त्यामुळेच बी.आर.चोप्रा यांनी प्रविण कुमार यांना भेटण्यासाठी बोलावले होते. जेव्हा भारदस्त प्रविण कुमार यांना बी.आर.चोप्रा यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते बोलले की मला माझा भीम मिळाला. आणि तिथूनच प्रविण कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.

Praveen Kumar Sobti

५० हून अधिक सिनेमात आजपर्यंत प्रविण यांनी काम केलं आहे. २०१३ साली आलेला 'महाभारत और बार्बर' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमातही त्यांनी भीमाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर मात्र त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम केला.अन् राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आम आदमी पार्टीतर्फे दिल्लीच्या वजीरपूर इथून निवडणूक लढवली होती. पण यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आम आदमीमधून भाजपा पक्षात प्रवेश कला. काही दिवसांपूर्वी प्रवीण कुमार यांनी सरकारकडे मदतीचा हाथ मागितला होता. त्या माध्यमातून त्यांनी पेन्शनची मागणी केली होती. त्यांनी आपल्याला खूप आर्थिक चणचण भासत असल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : विक्रम मोडणार! २६ लाख दिव्यांसह इतिहास रचणाऱ्या दीपोत्सवाची भव्य तयारी सुरू

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

Jalgaon News : जळगावकरांची दिवाळी खड्ड्यांतच! महामार्गावरील बिकट अवस्थेमुळे अपघात व धुळीचा त्रास

Pune River Pollution : पुण्यातील लकडी पुलाखाली राडारोडा टाकण्याची घटना, महापालिकेचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT