Raj Kumar Kohli Veteran Film Director Passed esakal
मनोरंजन

Raj Kumar Kohli Death : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज कुमार कोहली यांचे निधन, 'जानी दुश्मन' ठरला होता लोकप्रिय

बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे प्रथितयश निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे.

युगंधर ताजणे

Raj Kumar Kohli Veteran Film Director Passed Away : बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे प्रथितयश निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. Veteran film director Raj Kumar Kohli passed away in Mumbai

बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांनी वेगळी ओळख निर्माण करण्यात राज कुमार कोहली यांचा वाटा मोठा होता. त्यांनी १९६६ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. धुला भाटी आणि १९७० मध्ये लुटेरा या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन त्यांनी प्रेक्षकांना वेगळा आनंद दिला होता. त्यांच्या जाण्यानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.

राज कुमार कोहली यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांच्या जानी दुश्मननं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर नागिन, पती पत्नी और तवायफ, या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूड फिल्म विश्वाची मोठी हानी झाली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक सेलिब्रेटींनी दिल्या आहेत.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीचे वडील असणाऱ्या राज कुमार कोहली हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट निर्मिती करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या. दरम्यान त्यांचे हदयविकारानं निधन झाले आहे.

कोहली यांचे आज (२४ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सकाळी अंघोळीसाठी गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांना अभिनेता अरमान कोहलीनं उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी कोहली यांना मृत घोषित केले. असे वृत्त न्युज १८ नं प्रसिद्ध केले आहे.

कोहली यांच्या जानी दुश्मन या चित्रपटांबरोबरच बदले की आग, नोकर बिवी का आणि राज तिलक नावाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT