Raju Srivastava daughter Antara share health update Google
मनोरंजन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती विषयी मुलगी अंकिताची मोठी अपडेट

राजु श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्या कारणाने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

प्रणाली मोरे

Raju Srivastava health update: भारताचे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची तब्येत अत्यावस्थ असल्याचं सांगण्यात येत होतं . डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत, पण राजू श्रीवास्तव उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचं समोर आलं आहे. ५८ वर्षीय राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना ट्रेडमिलवर असतानाच हृद्यविकाराचा झटका आला होता. (Raju Srivastava daughter Antara share health update)

त्यांच्याविषयी उलट-सुलट बातम्या कानावर पडत असतानाच आता त्यांची मुलगी अंतरानं त्यांच्या चाहत्यांना अपील केलं आहे की सगळ्यांनीच तिच्या वडीलांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करावी. अंतरा म्हणाली की,''डॉक्टरांची टीम त्यांचे प्रयत्न करतच आहे,पण कधीकधी औषधांपेक्षा प्रार्थना काम करते,तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आणि प्रार्थनेची गरज माझ्या वडीलांना आहे''.

एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव यांची एंजियोप्लास्टी झाली आहे. त्यानंतरच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरानं वडीलांच्या तब्येतीविषयी सांगितले की,''माझे वडील कामाच्या निमित्तानं नेहमी दिल्ली आणि देशात इतरत्र जात असतात. ते नेहमी वर्कआऊट करतात. ते निरोगी होते,कोणताच आजार त्यांना नव्हता. आम्हाला त्यांला अटॅक आला कसा हेच कळत नाही. आम्हाला मोठा धक्का बसला आहे''.

अंतरा पुढे म्हणाली आहे की,''राजू श्रीवास्तव यांना बुधवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीत कोणती सुधारणा देखील नाही ना ती अधिक बिघडली आहे. पूर्ण डॉक्टरांची टीम त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही देवाजवळ प्रार्थना करत आहोत की ते लवकर बरे व्हावेत. माझी आई वडीलांसोबत आईसीयू मध्ये आहे''.

राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र डॉ. अनील मोरारका यांनी सांगितले की,'' श्रीवास्तव यांचा मेंदू व्यवस्थित काम करत नाही. ते पूर्णपणे बेशुद्धावस्थेत आहेत''. याच दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रिय रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी फोनवर डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीलाही आश्वस्त केलं आहे,संपूर्ण मदत करण्याचा शब्द दिला आहे.

राजू श्रीवास्तव आता काही दिवसांपूर्वीच 'इंडियाज लाफ्टर चॅंपियन' कार्यक्रमात दिसले होते. आपल्या अनेक भूमिकांमधून लोकांना खो-खो हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी अनेक बॉलीवूड सिनेमातून काम केले आहे. सलमान खानसोबत 'मैने प्यार किया', शाहरुख खानच्या 'बाजीगर'मध्ये ते दिसले होते. छोट्या प़डद्यावरील 'बिग बॉस','शक्तिमान','कॉमेडी सर्कस','द कपिल शर्मा शो' अशा अनेक शो मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT