Anjali Arora MMS वर आझमा फलाहचा खळबळजनक दावा; म्हणाली,'हे तिच्याच...' Azmah Fallah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Azma Fallah mocks Anjali arora for leaked mms video ,people trolled her back

Anjali Arora MMS वर आझमा फलाहचा खळबळजनक दावा; म्हणाली,'हे तिच्याच...'

Azma Fallah mocks Anjali arora for leaked mms video: अंजली अरोराच्या कथित एमएमएस वर लॉफअप फेम आजमा फल्लाहचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. अंजली आणि आझमा ओटीटी वरील लॉकअप शो(Lock Upp) मध्ये एकत्र होत्या. या दरम्यान दोघींमध्ये बरेच खटके उडायचे,भांडणं व्हायची. लॉकअप शो सुरु होता तेव्हा त्या दोघींमुळे त्यांच्या आयांमध्ये देखील भांडणं झाली होती. आता आझमा फल्लाहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी एका लीक झालेल्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात ती बोलताना दिसत आहे. आझमाने लॉकअप मध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत अंजली अरोराची खिल्ली उडवली आहे. तसंच,तिला दुर्भागी म्हणत हिणवलं आहे. आझमाने कितीतरी आक्षेपार्ह विधानं आपल्या व्हिडीओत केली आहेत,पण आता तिला यावरनं ट्रोल केलं जात आहे.(Azma Fallah mocks Anjali arora for leaked mms video ,people trolled her back)

काचा बादाम या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी अंजली अरोरा सध्या जोरदार चर्चेत आहे पण त्यामागचं कारण मात्र फारसं काही चांगलं नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ लीक झाला आहे. दावा केला जात आहे की, या MMS मध्ये जी मुलगी दिसत आहे ती अंजली अरोराच आहे. या क्लिपविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अद्याप यावर अजुनही कुठलंच स्पष्टिकरण समोर आलेलं नाही की व्हिडीओमध्ये दिसणारी ती मुलगी अंजली अरोराच आहे. आता या व्हिडीओनंतर अंजली अरोरासोबत लॉकअप शो दरम्यान एकत्र राहिलेली आझमा फल्लाह हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पोस्ट करत आझमाने कॅप्शन दिलं आहे की,''एका करमजलीचा म्हणजेच दुर्भागी असलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, जसं कर्म,तसं फळ मिळतं...''

आझमा बोलताना दिसत आहे की,''हॅलो हॉलीवूडच्या चाहत्यांनो. तुम्ही सर्वांनी त्या दुर्भागी मुलीचा व्हिडीओ तर पाहिलाच असेल. तिला आपल्या कर्माचं इतकं मोठं फळ मिळालं आहे की माझ्यानं राहवलं नाही आणि वाटलं त्या दुर्भागी मुलीचे काही कर्म तुमच्यासोबत शेअर करावेत. माझी अंतर्वस्त्र लॉकअप शो दरम्यान छतावर फेकणारी,आता स्वतः निर्वस्त्र झालेली दिसली. मला तुम्हाला आता विचारायचं आहे,तुम्हालाही पटलं ना, त्या व्यक्तीनं केलेलं कर्म त्याच्यावरच उलटलं''.

''तसं तर व्हिडीओमध्ये जे दिसलं ते हॉलीवूड लेवलचं होतं पण क्वालिटी मात्र खराब होती. एखादी रील बनवताना तर ती दुर्भागी महिला खूप नाचून व्हिडीओ बनवताना दिसते. यावेळी ती एचडीवर नाही दिसली''. आझमा पुढे म्हणते कशी,''ज्यानं पण त्या दुर्भागी सोबत हे दृष्कृत्य केलेलं आहे,त्याला आझमा फल्लाहचा सलाम. तसंही ह्या दुर्भागीनं मोठ मोठे कांड केलेले आहेत''.

आझमानं या व्हिडीओत खूप गलिच्छ भाषा वापरल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. एका मुलीविषयी ती असं कसं काय बोलू शकते असं लोक म्हणताना दिसत आहेत. तसंच आझमाच्या या व्हिडीओनंतर मुन्नवर फारुकी जो लॉकअप शो मध्ये आझमा,अंजली सोबत होता,शोचा विजेता ठरलेला आणि आझमाला आपली बहिण मानायचा त्यानं आता आझमाला अनफॉलो केलेलं आहे. तसंच बिदाई फेम सारा खाननं देखील लिहिलं आहे की कोणत्याही महिलेविषयी इतकं वाईट बोलणं खूप चुकीचं आहे.