r madhavan  Esakal
मनोरंजन

R Madhavan : 'भारताचं नाव मोठं होईल असे चित्रपट कधी बनवणार? आता देशभक्तीपर...' मॅडी काय बोलून गेला?

प्रसिद्ध अभिनेता आर माधवन हा नेहमीच त्याच्या परखड प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Ranganathan Madhavan exclusive interview : प्रसिद्ध अभिनेता आर माधवन हा नेहमीच त्याच्या परखड प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या रॉकेट्री या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता माधवननं एका कार्यक्रमात सध्याच्या चित्रपटविश्वातील घडामोडींकडे लक्ष वेधले असून त्यावर केलेलं भाष्य हे चर्चेत आलं आहे.

मॅडी म्हणाला की, भारतानं आता वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवणे गरजेचे आहे. केवळ विज्ञानावर आधारितच नव्हे तर भारताच्या ग्रामीण भागातील विविध विषय देखील यावेळी जगाच्या समोर यायला हवे. त्यातील आशय फारच ताकदीचा आहे. त्यात प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता देखील आहे. अशावेळी आपण त्याच त्याच विषयांमध्ये का अडकून पडतो असा प्रश्न माधवननं यावेळी उपस्थित केला. अमर उजालाशी संवाद साधताना माधवननं वेगवेगळ्या गोष्टींवर त्याची भूमिका मांडली आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

भारत आता आपल्या सामर्थ्यासाठी ओळखला जातो आहे. अशावेळी आपण नाविन्यपूर्ण विषयांना जगासमोर आणायला हवे. आपली अर्थव्यवस्था देखील मजबूत झाली आहे. आपण वेगवेगळ्या आव्हानांचा सामनाही करतो आहे. तेव्हा केवळ देशभक्तीवर किंवा स्वातंत्र्यावर आधारित चित्रपटांकडे लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा नवीन विषयांचा शोध घेता येईल का याचाही विचार करावा. असे देखील माधवननं यावेळी म्हटले आहे.

आपण अजूनही देशप्रेमाच्या कथांमध्ये अडकून पडलो आहोत. आणखी किती दिवस तेच तेच चित्रपट आपण पाहणार आहोत. भारतात कित्येक अशी लोकं आहेत ज्यांनी आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर यशस्वी केले. त्यांच्यामुळे भारताला मोठी ओळखही मिळाली. त्यांच्या कामाची दखल आपण घेणार आहोत की नाही, त्यांच्यावर चित्रपट तयार करणार आहोत की नाही, असा प्रश्न माधवननं उपस्थित केला.

रेल्वे मॅनची होतेय चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून आर माधवनच्या रेल्वे मॅनची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती. अखेर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तो प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरताना दिसतो आहे. आर माधवननं त्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला रॉकेट्रीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागला होता. माझी पत्नी सरिता हिनं देखील माझ्या त्या प्रोजेक्टचं कौतुक केलं होतं.

दरम्यानच्या काळात मी माझ्या आणखी पाच कथांवर काम केले. यापुढील काळात अजय देवगणसोबत वश नावाचा चित्रपट येतो आहे. त्यानंतर अक्षय कुमारसोबत देखील एका चित्रपटाचे काम सुरु होणार आहे. त्याचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. हिसाब बराबर नावाच्या चित्रपटामध्ये देखील माझा सहभाग आहे. याशिवाय आणखी एक तमिळ फिल्म आहे. त्याचे नाव आहे टेस्ट. आपण एका तमिळ फिल्मचे स्कॉटलंडमध्ये शुटिंग करणार असल्याचे माधवननं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT