Ranveer Singh REACTS to Sushmita Sen and Lalit Modi’s relationship news Google
मनोरंजन

सुष्मिता सेन-ललित मोदीच्या नात्यावर रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया चर्चेत

आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि व्यावसायिक ललित मोदी यांनी गुरुवारी रात्री १४ जुलै,२०२२ रोजी सोशल मीडियावर सुष्मिता सेनला आपण डेट करत आहोत असं जाहीर केलंय.

प्रणाली मोरे

आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि व्यावसायिक ललित मोदी(Lalit Modi) यांनी गुरुवारी रात्री १४ जुलै,२०२२ रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट केली जी काहीच क्षणात चर्चेचा विषय ठरली. अभिनेत्री सुष्मिता सेनला(Sushmita Sen) आपण डेट करत आहोत असं त्यांनी जाहीर केलं आहे. ललित मोदीने तर सांगितलं पण सुष्मिता सेनने मात्र यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. (Ranveer Singh REACTS to Sushmita Sen and Lalit Modi’s relationship news)

तसं पाहिलं तर सुष्मिता नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या अपडेट्स आपल्या चाहत्यांना देत असते. पण यावेळी असं काहीच नाही घडलं. पण आता ललित मोदीच्या या घोषणेनंतर बॉलीवूडमधून या दोघांच्या नात्याला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट समोर येत आहेत. यामध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि शिल्पा शेट्टीचं नाव घेता येईल.

ललित मोदीने सुष्मिता सेन सोबत आपले कितीतरी रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. त्यानं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे,''मी ग्लोबल टूर करून परत लंडनला परतलो आहे. कुटुंबासोबत मालदीव आणि सर्दानियाला गेलो होतो. मी आयुष्याची नवी सुरुवात करत आहे आणि मी खूश आहे. सुष्मिता सेन आणि मला दोघांना शुभेच्छा द्या. आज माझी स्वारी चंद्रावर आहे. मी खूप खूश आहे. प्रेमात पडलोय,याचा अर्थ असा नाही की मी लग्न केलं. अर्थात,देवाचा आशीर्वाद असेल तर ते देखील लवकरच होईल. मी फक्त एवढंच सांगितलं की आम्ही दोघं एकत्र आहोत''.

ललित मोदीच्या या पोस्टवर रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया बॉलीवूडमधून समोर आली आहे. रणवीरने हार्ट इमोजी पोस्ट करत कपलला नवीन नात्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटर हरभजन सिंगने देखील कपलवर शुभेच्छांच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. शिल्पा शेट्टी आणि अनाइता श्रॉफने ललित मोदीच्या पोस्टला लाइक केलं आहे. अभिनेता विद्युत जामवालची होणारी पत्नी नंदिता मेहतानीने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत शुभेच्छा दिल्यात.

Ranveer Singh Reaction On Lalit Modi Post

सुष्मिता सेन सध्या हॉलिडेवर आहे. मालदीव आणि सर्दानियामधून ती फोटो शेअर करताना दिसत आहे. आता तिनं केलेल्या कुठल्याही फोटोत ललित मोदी कुठेच दिसत नाही. मालदीव मधून सुष्मितानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता,ज्यामध्ये पूल जवळ ती आरामात पहुडलेली दिसत आहे. याला कॅप्शन देत अभिनेत्रीनं लिहिलं होतं,''मला तु हवा आहेस. तु माझ्या आयुष्यातलं प्रेम आहेस''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

SCROLL FOR NEXT