Koffee with karan 7:सारानं केलं कन्फर्म, कार्तिकशी अफेअर- ब्रेकअपचा खुलासा? Karan Johar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan7: Sara confirmed the relation with kartik, reveal reason behind breakup?

Koffee with karan 7:सारानं केलं कन्फर्म, कार्तिकशी अफेअर- ब्रेकअपचा खुलासा?

दोन वर्षापूर्वी सारा(Sara ali khan) आणि कार्तिक(Kartik Aaryan) यांच्यात अफेअर होतं याविषयी सगळीकडेच चर्चा रंगली होती. २०२० साली आलेल्या त्यांच्या 'लव आज कल' च्या शूटिंग दरम्यान ते दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. 'कॉफी विथ करण ७'(Koffee With karan7) च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खाननं या गोष्टीला आता कन्फर्म केलं आहे. शो मध्ये सारा सोबत तिची खास मैत्रिण अभिनेत्री जान्हवी कपूर देखील आली होती. यावेळी दोघींनीही आपल्या रिलेशनशीप्स आणि सेक्स लाइफ विषयी मोकळेपणानं संवाद साधला. यावेळी करण जोहरला संधी मिळालीच की त्यानं बोलता बोलता आर्यनचे नाव घेत साराच्या लव्ह लाइफचा मुद्दा खोदून काढला. आणि सारानेही त्याला उत्तर देत प्रतिसाद दिला.(Koffee With Karan7: Sara confirmed the relation with kartik, reveal reason behind breakup?)

हेही वाचा: 'रणबीर कपूरनं ब्लू फिल्ममध्ये काम केलंय का?', नोरा फतेहीला का पडला हा प्रश्न?

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा किस्सा सुरु देखील झाला तो 'कॉफी विथ करण ६' पासून. तेव्हा सारा शो मध्ये आपले वडील सैफ अली खान सोबत आली होती. त्यावेळी रॅपिड फायर राउंडच्या दरम्यान करणने अभिनेत्रीला विचारलं होतं की,बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्याला तिला डेट करायला आवडेल. तेव्हा सारानं क्षणात उत्तर देत कार्तिकचं नाव घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा दोघांनी 'लव आज कल' चे शूटिंग सुरू केले तेव्हा ते एकमेकांना डेट करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अर्थात दोघांनीही यावर सर्वांसमोर बोलणं टाळलं. पण आता पुन्हा करणच्या शो मध्ये हा विषय निघाला अन् साराही मग बोललीच.

हेही वाचा: Lalit Modi: सुश्मिताचं रोहमनशी ब्रेकअप, खुश होत ललित मोदी म्हणाले होते....

करण जोहरने सारा अली खानला म्हटलं की,''गेल्यावर्षी तु जेव्हा शो मध्ये आली होतीस तेव्हा तू म्हटंल होतंस की तुला कार्तिक आर्यनला डेट करायचं आहे''. त्यावर सारा 'हो' म्हणाली. हे असं असलं तरी याच शो दरम्यानं साराने विजय देवराकोंडाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही सारानं रणवीर सिंगचे देखील नाव घेतले. पण तिथे करण जोहरने तिला टोकत म्हटलं ,''त्याचं लग्न झालं आहे''. तेव्हा सारा म्हणाली,''काय फऱक पडतो,क्रश तर क्रश असतो''.

हेही वाचा: दोन सख्ख्या भावांशी सारा-जान्हवीचं जुळलेलं सूत,दोघे करण जोहरचे सख्खे शेजारी

आता एवढं सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर कन्फर्म झाली आहे की सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी एकमेकांना नक्कीच डेट केलं होतं. जेव्हा दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली तेव्हा ते अमृता सिंगमुळे झाल्याची बातमी समोर आली होती. बोललं जातं की अमृता सिंगला सारा आणि कार्तिकमधील जवळीकता खटकत होती. कारण अफेअरच्या बाबतील कार्तिक आर्यनचा रेकॉर्ड काहीसा चांगला नाही असं देखील म्हटलं जात आहे. कारण तो ज्या अभिनेत्रीसोबत काम करतो तिच्याशी त्याचं नाव जोडलं जातं. आणि हे अमृता सिंगच्या कानावर पडलेलं होतं,जे तिला आवडलं नाही.

हेही वाचा: एलन मस्कच्या ७६ वर्षीय वडीलांचे आपल्याच सावत्र मुलीसोबत शारिरीक संबंध

याच शो मध्ये साराने आपल्या एक्सविषयी बोलताना पटकन एक वाक्य म्हटलं होतं,''मेरा एक्स सबका एक्स है...'',त्यामुळे कुठेतरी सारा- कार्तिकचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणानं झालं असेल याचा अंदाज हळूहळू सर्वांनाच येत आहे.

Web Title: Koffee With Karan7 Sara Confirmed The Relation With Kartik Reveal Reason Behind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top