खूप दिवसांनी कतरिना एअरपोर्टवर, अभिनेत्रीला पाहताच 'बेबी बंप' ची चर्चा सुरु Katrina Kaif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amid Pregnancy Rumours, Katrina Kaif Clicked At Airport With Hubby Vicky Kaushal

खूप दिवसांनी कतरिना एअरपोर्टवर, अभिनेत्रीला पाहताच 'बेबी बंप' ची चर्चा सुरु

बी टाऊनचं प्रसिद्ध कपल विक्की कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif) यांचे नुकतेच क्लिक केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले अन् अभिनेत्रीच्या बेबी बंपची(Baby Bump) चर्चा रंगायला सुरुवात झालेली दिसून आली. खरंतर,विक्की कौशल आणि कतरिना कैफ आपल्या काही मित्रांसोबत अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाले आहेत. यादरम्यान त्यांना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. आणि इथलेच काही विकी-कतरीनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(Amid Pregnancy Rumours, Katrina Kaif Clicked At Airport With Hubby Vicky Kaushal)

हेही वाचा: Koffee with karan 7:सारानं केलं कन्फर्म, कार्तिकशी अफेअर- ब्रेकअपचा खुलासा?

कतरिना कैफचे हे फोटो समोर येताच पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विकी कौशलही या फोटोत क्लीन शेव लूक मध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे सर्वांच्या नजरा कतरिनाच्या स्वेटशर्टवर खिळल्या आहेत. कतरिना गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइटपासून पूर्ण लांब आहे. त्यामुळेच तिच्या प्रेग्नेंसीविषयीच्या बातम्या वेगानं पसरु लागल्या आहेत. आणि नेमकं त्याचवेळी पती विकी कौशलसोबत तिला मुंबई एअरपोर्टवर क्लीक केलं गेलं. यावेळी कतरिना आणि विकी हातात हात घालून चालताना दिसले. एअरपोर्टचा तो व्हिडीओ बातमीत जोडलेला आहे.

माहितीसाठी सांगतो की १६ जुलै रोजी कतरिनाचा वाढदिवस आहे. आणि त्याच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी हे दोघे मालदीवला चालले आहेत. विक्कीनं मालदीवमध्ये कतरिनासाठी स्पेशल व्हॅकेशन पॅक बूक केल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्रीच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर सध्या तिच्या 'फोन बूथ' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये लवकरच बिझी होईल. कारण सिनेमा प्रदर्शनाच्या वाट्यावर आहे. त्यानंतर तिचे 'मेरी क्रिसमस','टायगर ३' सिनेमे देखील रिलीज होतील. या व्यतिरिक्त कतरिना फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमातही काम करतेय. या सिनेमात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रा देखील मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

Web Title: Amid Pregnancy Rumours Katrina Kaif Clicked At Airport With Hubby Vicky Kaushal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top