Ranveer Singh's Jayeshbhai Jordaar Poster released
Ranveer Singh's Jayeshbhai Jordaar Poster released  
मनोरंजन

रणवीर सिंग बनला गुजराती छोकरा, 'जयेशभाई जोरदार' चा पोस्टर एकदा बघाच !

वृत्तसंस्था

मुंबई : रणवीर सिंग नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकरातना दिसतो. कॉमेडी, रोमान्स, ऐतिहासिक आणि अशा अनेक प्रकारच्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी थआप सोडली आहे. 'गल्ली बॉय' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चागंलाच धमाका केल्यावर रणवीर नव्या सिनेमासह सज्ज झाला आहे. 'जयेशभाई जोरदार' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

या चित्रपटामध्ये रणवीर एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये रणवीरचा लुक एकदम हटके दिसत आहे. पोस्टरवरुन असं लक्षात येत आहे की, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. रणवीरने इनस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये रणवीरच्या मागे बऱ्याच महिला चेहऱ्यावर घुंघट (पदर)घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत. या सर्व महिलांचं रणवीर रक्षण करताना दिसतोय. पोस्टर प्रदर्शित झाल्यावर काही वेळातच सोशल मीडियावर तो व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टर शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,'जयेशभाई आहे एकदम जोरदार'. 

या चित्रपटाचा पोस्टर आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा पोस्टर कंगणा रणावतच्या 'तन्नू वेड्स मन्नू' या सिनेमाशी मिळता जुळता आहे. त्यामुळे जयेशभाई जोरदारचा पोस्टर कॉपी केला असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यकत केलं आहे. 

हा चित्रपट यशराज फिल्म' च्या बॅनरखाली तयार होणार आहे. रणवीर मुख्य भूमिका साकारताना दिसणार असून इतर कोणते कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दिव्यांग ठाकून दिग्दर्शन करणार असून मनीष शर्मा निर्मिती करणार आहेत. 

रणवीर आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोन आगमी चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. '83' असं या चित्रपटाचं नाव असून तो क्रिकेटर कपिल देव यांच्यावर आधारीत असणार आहे. रणवीर कपिल देव यांची भूमिका साकराताना दिसणार आहे. रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिला एकत्र चित्रपट असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT