मुंबई : महानायक अमिताभ बच्चन व अभिनेत्री रेखा यांची जोडी 36 वर्षांपूर्वी सिलसिला या चित्रपटापासून विशेष चर्चेत आली. अमिताभ बच्चन व रेखा समोरासमोर आले की प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात. परंतु एकमेकांसमोर येऊ नये यासाठी काळजीही घेतली जाते. एका कार्यक्रमादरम्यान रेखा यांनी बच्चन यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर तत्काळ तोंड फिरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सिलेब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी हे प्रत्येकवर्षी कॅलेंडर प्रसिद्ध करतात. बॉलिवूडच्या टॉप कलाकारांच्या फोटोंसह नव्या वर्षाचे कॅलेंडर ते बनवतात. हे कॅलेंडर नेहमीच चर्चेत असते. डब्बू रतनानी यांनी सोमवारी (ता. 28) आपले कॅलेंडर प्रसिद्ध केले. यावेळी रेखासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रेखा यांना फोटोग्राफर्सनी त्यांना कॅलेंडरमधील फोटोंना पाहताना पोझ देण्याची विनंती केली. रेखा फोटोग्राफरच्या विनंतीला होकार दिला. परंतु, मागे वळताच त्यांना अमिताभ बच्चन यांचा फोटो दिसला. बच्चन यांचे छायाचित्र पाहताच त्यांनी तोंड फिरवले व तत्काळ बाजूला झाल्या. रेखा यांची रिअॅक्शन पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले व सर्वजण जोरात हसू लागले. परंतु, नेमका तो क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघांच्या प्रेमाच्या आठवणीबाबत नेटिझन्स व्यक्त होऊ लागले आहेत. एक्स बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्डला पाहिल्यानंतर प्रतिक्रिया कशी असेल, हेच रेखा यांनी दाखवले, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.