sachin and supriya pilgaonkar  
मनोरंजन

Video : सचिन-सुप्रिया पिळगावकर जोडीचा धमाकेदार डान्स

या जोडीला एकत्र नाचताना पाहणं ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते.

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर 4' च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये अभिनेते सचिन पिळगावकर Sachin Pilgaonkar आणि सुप्रिया पिळगावकर Supriya Pilgaonkar यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या स्पेशल एपिसोडमध्ये स्पर्धकांसोबत सचिन आणि सुप्रिया यांनी अक्षरश: धमाल केली. ‘चला जेजुरीला जाऊ’ या गाण्यावर सचिन-सुप्रिया या जोडीने धमाकेदार डान्स केला. पडद्यावर या जोडीला एकत्र नाचताना पाहणं चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. यावेळी शोचे परीक्षक मलायका आरोरा, अनुराग बासू आणि गीता कपूर यांनी सचिन आणि सुप्रिया यांच्या डान्सचे भरभरून कौतुक केले. (sachin and supriya pilgaonkar performed lavani in Super dancer show watch video)

'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' या गाण्यावर या शोमधील स्पर्धक प्रतीती दास आणि कोरिओग्राफर श्वेता वारियरने 'लावणी' आणि 'भरतनाट्यम'चा फ्युजन डान्स सादर केला. त्यांच्या डान्सला पाहून सचिन आणि सुप्रियानेदेखील डान्स केला. 'सुपर डान्सर 4'च्या या स्पेशल एपिसोडमध्ये सचिन आणि सुप्रिया यांनी स्पर्धकांना डान्समधील बारकावे सांगितले तसेच ‘लावणी’ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती दिली. याआधी देखील सचिन आणि सुप्रिया यांनी या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी सचिन यांनी ‘या रावजी बसा भावजी’ या गाणायावर लावणी सादर केली होती.

सध्या महाराष्ट्रात लॉकडाउन असल्याने इतर मालिका आणि शोजप्रमाणे 'सुपर डान्सर 4'चेही शूटिंग राज्याबाहेर नव्या ठिकाणी होत आहे. या नव्या पर्वात परीक्षक शिल्पा शेट्टीची जागा मलायका अरोराने घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP vs Raghav Chadha : राघव चढ्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात, 'आप'चे आपल्याच खासदारावर गंभीर आरोप

Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

School Development: शासनाचा निर्णय! माजी विद्यार्थ्यांच्या बळावर होणार शाळांचा कायापालट; शाळांमध्‍ये संघाची स्थापना..

Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

SCROLL FOR NEXT