Sara Tendulkar popularity how Justin Bieber wished her birthday
Sara Tendulkar popularity how Justin Bieber wished her birthday 
मनोरंजन

जस्टीनभाऊचा सारा तेंडूलकरसाठी खास व्हिडिओ 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - क्रिकेटचा देव म्हणून सचिन सर्वांना परिचित आहे. क्रिकेटपासून दुर झाल्यानंतरही त्याचा प्रेक्षकांवरील प्रभाव काही कमी झालेला नाही. सचिनची क्रेझ अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. सचिनबरोबरच त्याची दोन्ही मुलेही सेलिब्रेटी आहेत असे म्हणायला हरकत नाही. मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत. आता त्याची मुलगी सारा ही चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या एवढी आहे की तिनं बॉलीवूडमधल्या काही सेलिब्रेटींना त्याबाबत पिछाडीवर सोडले आहे. आयपीएलच्या दरम्यान साराच्या नावाची चर्चा कानावर येत होती. तिचं एका क्रिकेटपटूशी नाव जोडलं जात होतं. त्या क्रिकेटपटूचे फोटो तिनं आपल्या व्हाटसअपचा डीपी म्हणूनही ठेवला होता.

सचिनची जशी लोकप्रियता आहे तशी साराही आता लाईमलाईटमध्ये आली आहे. तिला इंस्टाग्रामला फॉलो करणा-यांची संख्या 1.2 मिलियन एवढी आहे. तेवढीच संख्या तिच्या अन्य सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मलाही आहे. सारा इंस्टावर एवढी अॅक्टिव्ह नसते. केवळ भारतीयच नाही तर विदेशी लोकंही साराला फॉलो करतात. त्यांची संख्याही मोठी आहे. अर्जुन आता क्रिकेटमध्ये आला आहे. तर सारा सोशल मीडियावर आपली ओळख प्रस्थापित करताना दिसत आहे.

साराचं शिक्षण हे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून झाले आहे. तसेच तिनं लंडनमधील एका विद्यापीठातून मेडिसनची पदवी घेतली आहे. सारा ही कॅनेडियन गायक जस्टीन बीबरची मोठी फॅन आहे. त्याचा खुलासा तेव्हा झाला होता जेव्हा बीबरनं तिच्या इंस्टाला एक व्हिडिओ शेअर केला होता. साराच्या जन्मदिनाच्या निमित्तानं तो त्यानं बनवला होता.  सारा तिच्या सुंदर दिसण्यासाठीही प्रसिध्द आहे. त्यामुळे तिला ग्लॅमरही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तिची स्टाईल ही अनेकदा बॉलीवूडमधल्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. काही दिवसांपूर्वी सारा ही चित्रपटात येणार अशी चर्चा होती. मात्र त्यावर सचिननं सांगितले की असा कुठलाही विचार नाही. 
 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT