Sai Pallavi Birthday  esakal
मनोरंजन

Sai Pallavi Birthday : साईला 'True Indian Beauty' का म्हणतात?

साईचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं लाखो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sai Pallavi Birthday : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या करिअरमध्ये तिनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साई पल्लवीचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिला इंस्टावर फॉलो करणारे काही कमी नाहीत.

साईचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं तिच्या लाखो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साई आज तिचा ३१ वा जन्मदिवस साजरा करत आहे. आपल्या सोज्ज्वळ सौंदर्यानं साईनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून साई ही बॉलीवूडमध्ये इंट्री करणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजुनतरी तो योग काही जुळून आलेला नाही. ९ मे १९९२ मध्ये तामिळनाडूतील कोटागिरीमध्ये साईचा जन्म झाला. तिनं आतापर्यत तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अनेकांना साईच्या मल्टिटँलेंटविषयी माहिती नाही. कित्येकांनी ती फक्त अभिनेत्री म्हणूनच माहिती आहे. मात्र याशिवाय ती नृत्यात तरबेज आहे, ती डॉक्टर आहे याविषयी अनेकांना माहिती नाही. तिनं बित्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. मात्र साईच्या नशीबात डॉक्टर होणं नव्हतंच. तिचा कल अभिनेत्री होण्याकडे जास्त होता. तुम्हाला माहितीये, साईला आठ भाषा बोलता येतात. साईची लोकप्रियता आता जगभरात सगळीकडे आहे. २०१७ मध्ये तिचा फिदा नावाचा चित्रपट आला होता. तेव्हापासून साई चाहत्यांची लाडकी अभिनेत्री झाली.

त्यानंतर साईनं मिडल क्लास अब्बाय, मारी २, लव स्टोरी आणि श्याम सिंघा रॉय सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. साई ही कधीही तिच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक प्रॉडक्टचा वापर करत नाही. यासाठीच की काय तिला एका ब्युटी प्रॉडक्टची आलेली दोन कोटींची ऑफर तिनं नाकारली होती. मी भारतीय आहे आणि मला माझ्या रंगाचा अभिमान आहे. ब्युटी प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेषत महिलांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे साईचे म्हणणे आहे. त्यानंतर लोकांनी तिला ट्रु इंडियन ब्युटी असं म्हणण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT