Salman Khan bollywood Actor Kisi ka Bhai kisi ki jaan : बरं झालं बॉलीवूडच्या भाईजाननं सलमान सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले ते. त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुणी जर त्या विषयावर बोलला असता तर त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला असता. यापूर्वी बॉलीवूडमधील स्टार अभिनेते शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटांविषयी वेगळ्याच प्रकारचा प्रचार केला जात होता.
सलमानचा किसी भाई किसी की जान नावाचा चित्रपट येत्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या सलमान त्याच्या प्रमोशनच्या गडबडीत असल्याचे दिसून आले आहे.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आमचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चालत नसल्याची तक्रार केली आहे. त्याविषयी त्यानं आगामी काळात काय करायला हवे याविषयी सांगितले आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.
Also Read सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
एका अॅवॉर्ड शोमध्ये सलमाननं बॉलीवूड आणि सध्याची परिस्थिती यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तो म्हणाला, मला माहिती आहे बॉलीवूडचे चित्रपट फारसे परिणामकारक ठरताना दिसत नाही. आमचे चित्रपट फ्लॉप का होतात हे लक्षात येत नाही. मला वाटतं आम्ही चुकीच्या पद्धतीनं चित्रपट तयार करतो त्याचा परिणाम आमच्या चित्रपट निर्मितीवर होत असल्याचे दिसून आले आहे. वेगळा विषय, त्याची वेगळी मांडणी असं काही केलं तर त्यामुळे आपण अधिक चांगला चित्रपट तयार करु शकतो.
एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांची मोठी हवा आहे. त्यांची कमाई मोठी आहे. बॉक्स ऑफिसवर त्यांनी केलेली कमाई आणि यश हे चर्चेत आहे. दोन वर्षांपासून चित्र वेगळे दिसते आहे. याचाही विचार बॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्यांनी करायला हवा. असेही सलमान खाननं म्हटले आहे. आता त्याच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.