
महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेला वाद राजकीय वर्तुळापासून उद्योगपतींच्या कार्यालयांपर्यंत पोहोचला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती सुशील केडिया यांच्या कार्यालयावर हल्ला केला. विटा आणि दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यानंतर सुशील केडिया यांनी ट्विट करत माफी मागितली होती. मात्र त्याच्या काही वेळानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत डिवचले आहे. त्यांचे आता नवे ट्विट व्हायरल होत आहे.