Samantha Ruth Prabhu join Vicky Kaushal's 'The Immortal Ashwatthama'?  Google
मनोरंजन

विकी कौशलच्या बहुचर्चित 'अश्वत्थामा' मध्ये समंथा रुथ प्रभू? वाचा सविस्तर

'The Immortal Ashwatthama' सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी दिग्दर्शक आदित्य धरने समंथाशी बोलणी केल्याचं कळत आहे.

प्रणाली मोरे

समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) आपल्या बॉलीवूड(Bollywood) एन्ट्रीसाठी(Entry) सज्ज आहे. नुकतीच एक बातमी समोर आली आहे की आयुषमान खुरानासोबत दिनेश विजनच्या सिनेमात ती दिसणार आहे. पण त्या पाठोपाठ आता बातमी कानावर पडतेय की विकी कौशलच्या(Vicky Kaushal) बहुचर्चित 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' या सिनेमात ती दिसण्याची शक्यता आहे.(Samantha Ruth Prabhu join Vicky Kaushal's 'The Immortal Ashwatthama'?)

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार आदित्य धरने 'अश्वत्थामा' सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केलं आहे. आणि या सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारण्यासाठी आदित्यने समंथासोबत बोलणी सुरू केली आहेत.

एका इंग्रजी वेबसाईटला मिळालेल्या वृत्तानुसार,'अश्वत्थामा' सिनेमाचं शूटिंग २०२३ मध्ये सुरू होऊ शकतं. सिनेमाच्या कलाकारांची निवड पूर्ण होत आली असून बजेटवरचं कामही पूर्ण झालं आहे. आदित्यने समंथाला ऐकवलेली सिनेमाची स्टोरीलाइनही पसंतीस उतरली आहे. जर सगळं जुळून आलं तर समंथा आणि विकीची जोडी पडद्यावर पहायला मिळेल.

सध्या विकी त्याच्या 'सॅम बहाद्दुर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक बायोपीक आहे. विकीनं आपले सहा ते आठ महिने या सिनेमाच्या शूटिंगमध्ये घालवले आहेत. या सिनेमाचं काम आटोपल्यानंतर विकी आदित्यच्या 'अश्वत्थामा' सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे.

समंथा संदर्भात अफवा आहे की ती आयुषमन खुराना सोबत सिनेमात काम करतेय. तापसी पन्नूच्या सिनेमातही ती दिसणार आहे. तर असंही कानावर पडतंय की समंथा अक्षय कुमार सोबत करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT