हिंदुत्वाची कास धरून भारताची निर्मिती अशक्य, लीना मणिमेकलाईचा BJP वर निशाणा

लीना मणिमेकलाईच्या 'काली' सिनेमाच्या वादग्रस्त पोस्टरवरुन राजकीय पक्षांनी तिच्याविरोधात आवाज उठवत तक्रारीही दाखल केल्या आहेत.
Hindutva can never become India': Leena Manimekalai tweets
Hindutva can never become India': Leena Manimekalai tweetsGoogle

'काली'(KAALI) सिनेमाच्या पोस्टरवरुन रंगलेल्या वादामुळे(Controversy) मदुराईत जन्माला आलेली कनेडियन फिल्ममेकर लीना मणिमेकलाई(Leena Manimekalai) चर्चेत पहायला मिळतेय. खूप वादानंतर लीनानं आता आपल्या विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तिनं तिखट प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर आपल्या विरोधकांवर पलटवार केला आहे. लीनानं एक ट्वीट केलं आहे आणि आपला बचाव करताना दक्षिणपंथीयांना फटकारलं आहे.(Hindutva can never become India': Leena Manimekalai tweets)

Hindutva can never become India': Leena Manimekalai tweets
KAALI Controversy: लीनाचं नवं ट्वीट,शंकर-पार्वतीच्या फोटोवरनं रंगला नवा वाद

लीनाने गुरुवारी ७ जुलै रोजी एकापाठोपाठ एक बरेच ट्वीट्स केले. सगळ्यात पहिल्यांदा लीनानं आणखी एक वादग्रस्त पोस्ट करत फोटो शेअर केला,ज्यामध्ये शंकर-पार्वतीच्या पेहरावात कलाकार धुम्रपान करताना दिसत आहेत. या फोटोवरुन लीनाला ट्रोल केलं जात आहे. यानंतर तिनं एका परदेशी वर्तमानपत्रातील बातमी शेअर केली,ज्यामध्ये म्हटलं आहे की,''असं वाटतंय की पूर्ण देश जो आतापर्यंत लोकशाहीवर चालला होता,तो आता लोकशाही विरोधात बोलणारा देश झालाय,भारत 'हेट मशिन' बनला आहे. मला सेन्सॉर करु पाहत आहेत. मला कुठेच सुरक्षित वाटत नाही''.

लीनानं तिला सोशल मीडियावर फटकारणाऱ्या नेटकऱ्यांना देखील चांगलच फैलावर घेतलं. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''हे ट्रोलर्स माझ्या कला स्वातंत्र्यावर गदा आणू पाहत आहेत. जर मी या मूर्ख दक्षिणपंथीयांना घाबरुन माझं स्वातंत्र्य गमावलं तर मी सगळ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणेन. मग यासाठी माझ्या रस्त्यात कुणीही आलं तरी मी त्याचा सामना करेन''.

लीनानं आपल्या ट्वीटमध्ये बीजेपीवर देखील हल्लाबोल केला आहे. तिनं लिहिलं आहे,''बीजेपीच्या पैसे भरुन जमा केलेल्या ट्रोल आर्मीला या गोष्टीची कल्पना नाही की थिएटर आर्टिस्ट आपला परफॉर्मन्स झाला की कसे आराम करतात. हा माझ्या सिनेमातला भाग नाही. ग्रामीण भारतात हे सहज घडतं,ज्याला संघाची लोक चूकीचं म्हणतात आणि आपल्या धार्मिक कट्टरतावादी विचारांनी नेस्तनाबूत करु पाहतात. हिंदुत्वाची कास धरून भारताची निर्मिती अशक्य''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com