Sangram Samel will plays role in Vicky Velingkar
Sangram Samel will plays role in Vicky Velingkar  
मनोरंजन

संग्राम दिसणार 'विक्की वेलिंगकर'मध्ये!

सकाळ वृत्तसेवा

‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात मराठीतील अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनय करणारा अभिनेता संग्राम समेळ एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आता लवकरच तो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी संग्रामने त्याचे सिनेमातील पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. संग्राम समेळ पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘मला ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. संग्राम आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे, संग्राम यामध्ये विक्कीच्या मित्राची भूमिका साकारत आहे आणि तो एक हॅकर आहे. त्याची भूमिका ही मैत्रीसाठी जीवाला जीव लावणार असं हे पात्र आहे. मला संग्रामबरोबर काम करताना खूप मज्जा आली’ असे सोनाली कुलकर्णी सांगते.

अभिनेता संग्राम समेळ हा यापूर्वी उंडगा, ब्रेव्ह हार्ट, ललित २०५ यांसारख्या मालिकांमधून तसेच एकच प्याला, कुसुम मनोहर लेले यांसारख्या नवीन नाटकांमधून तसेच वर खाली दोन पाय या नाटकामधून संग्राम समेळ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. तसेच यांच्याबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT