Sapana Chaudhary
Sapana Chaudhary  esakal
मनोरंजन

Sapana Chaudhary : सपना आली गोत्यात, वहिनीनं अख्ख्या कुटूंबाला...

सकाळ डिजिटल टीम

Sapna Choudhary : मनोरंजन विश्वामध्ये सपनाचे नाव माहिती नाही असा कुणी शोधून सापडणार नाही. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहे. या हरियाणवी डान्सरच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या सपनाच्या वहिनीनं अख्या कुटूंबाला अडचणीत आणलं आहे.

सपनाच्या वहिनीनं आता थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सपनाच्या कुटूंबाकडून तिच्या वहिनीचा शाररिक मानसिक छळ सुरु असल्याची चर्चा आहे. तिनं त्याबाबत पोलिसांकडे तक्रारही दिली आहे. एकीकडे सपनाची लोकप्रियता वाढत असताना तिच्या वहिनीनं पोलिसांकडे जाऊन दिलेली तक्रार सपनाची डोकेदुखी वाढवताना दिसते आहे. यामुळे सपनाही अडचणीत आली आहे.

Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सपनाच्या अख्ख्या कुटूंबावर कौटूंबिक हिंसाचाराचा, मारहाण करत असल्याचा आरोप तिच्या वहिनीनं केला आहे. सपनाला देखील या गोष्टींविषयी माहिती होती पण ती देखील काहीही करु शकली नाही. असेही तिच्या वहिनीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. २०१८ मध्ये माझे लग्न झाले त्यावेळी दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये लग्न करण्यात आले. तेव्हा ४२ लाख रुपयांचा खर्च त्या लग्नामध्ये झाला होता. शिवाय मोठ्या प्रमाणात सोनेही सासरच्या लोकांना दिले होते. असा आरोप वहिनीनं केला आहे.

काय आहे सपनाच्या वहिनीचा आरोप?

पीडीतानं पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, सासरच्यांना लोकांनी मला नेहमीच त्रास दिला. त्यांना मी सून म्हणून पसंत नव्हते. मला माहेरुन पैसे आणणण्यासाठी त्रास दिला जात असे. मी जेव्हा मुलीला जन्म दिला तेव्हा मला घरुन तीन लाख रुपये, चांदी आणि नवीन कपडे आणायला लावले होते. प्रत्येकवेळी मानसिक, शाररिक त्रास देण्यात आला. सपनाचं कुटूंब हे नेहमीच माझ्या माहेरच्या माणसांकडून पैशांची अपेक्षा करत होतं. असा आरोप सपनाच्या वहिनीनं केला आहे.

मी जर सासरच्या मंडळींना नकार दिला तर त्यांनी मला मारहाण केली. माझ्या नवऱ्यानं तर दारुच्या नशेत मला शिवीगाळ केली. वाट्टेल तसा तो बोलला. हे सारं सहन न झाल्यानं मला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली असे सपनाच्या वहिनीनं म्हटले आहे. सोशल मीडियावर देखील या गोष्टीची खूप चर्चा झाली आहे. गेल्याच वर्षी सपनाच्या भावानं माझ्या पतीनं मला प्रचंड त्रास दिला होता. असेही तिनं आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT