Sara Ali khan to essay the role of freedom fighter usha mehta in karan johar film Google
मनोरंजन

'चले जाव' चळवळीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी साकारणार सारा

सारा अली खान करण जोहरच्या 'ए वतन..मेरे वतन' सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वातंत्र्यसेनानीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

प्रणाली मोरे

Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali khan) आता लवकरच करण जोहरच्या (karan Johar)आगामी सिनेमात आपल्याला दिसणार आहे. बातमी आहे की देशभक्तीपर सिनेमा 'ए वतन..मेरे वतन' सिनेमात ती स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.(Sara Ali khan to essay the role of freedom fighter usha mehta in karan johar film)

साराच्या या नव्या सिनेमाचं शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. साराने या वर्षाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा साइन केला होता. आता आपल्या इतर सिनेमांचं उर्वरीत शूटिंग मार्गी लावल्यानंतर सारा साराने आपलं पूर्ण लक्ष या देशभक्तीपर सिनेमावर केंद्रित केलं आहे.

सारानं सिनेमाची तयारी करायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच ती एका स्वातंत्र्यसेनानीच्या भूमिकेत दिसणार आहे,त्यामुळे अर्थातच अभिनेत्री उत्सुक आहे. ऐकण्यात आलं आहे की या सिनेमाचं कथानक उषा मेहता यांनी कॉंग्रेस रेडिओ नावाने सुरु केलेल्या एका अंडरग्राउंड रेडियो स्टेशनवर आधारित आहे, जो १९४२ साली चले जाव चळवळीच्या दरम्यान काही महिने कार्यरत होता.

Sara Ali khan to essay the role of freedom fighter usha mehta in karan johar film

स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षात कॉंग्रेस रेडिओने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती,याच रेडिओच्या माध्यमातून ब्रिटिश गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या बातम्या आणि इतर माहिती प्रसारित केली जायची.

सारा अली खान अभिनित 'ए वतन,मेरे वतन' सिनेमाला कन्नर अय्यर दिग्दर्शित करणार असून ,करण जोहर सिनेमाची निर्मिती करणार आहे. कन्नन अभिनव बिंद्राच्या बायोपीक वर देखील काम करणार असल्याची बातमी आहे. पण सध्या कनन 'ए वतन,मेरे वतन'च्या कामामध्ये व्यस्त असल्याचं बोललं जात आहे. बातमी आहे की दिग्दर्शक केतन मेहता देखील उषा मेहतांच्या बायोपीकवर(Biopic) काम करत आहे. उषा मेहता या केतन मेहता यांच्या नात्याने आत्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT