'लाल सिंग चड्ढा का पाहू नका?'; राजू श्रीवास्तवनी व्हिडीओतून आधीच केलेलं सूचित

लाल सिंग चड्ढा सिनेमावरील बहिष्कार आणि आमिर खाननं केलेल्या चुका यांचा पाढाच राजू श्रीवास्तव यांनी आजारी पडण्यापूर्वी शूट केलेल्या व्हिडीओत वाचला आहे.
Raju Srivastava's old video on Lal Singh Chaddha goes viral
Raju Srivastava's old video on Lal Singh Chaddha goes viralGoogle

Raju Srivastava's old video: गजोधर बनून सगळ्यांना खळखळवून हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या जीवन-मृत्यूशी लढा देत आहेत. जशी बातमी कानावर पडते की त्यांच्या तब्येतीत सुधार होत आहे तसा चाहत्यांना थोडा धीर येतो पण लगेचच जेव्हा कळतं की आता डॉक्टरांनीही आशा सोडली आहे तेव्हा मात्र चाहत्यांचे हृद्याचे ठोके निश्चितच वाढत आहेत. आतापर्यंत राजू श्रीवास्तव यांचे निकटवर्तीय,कुटुंबिय आणि मित्र-परिवार यांच्याकडून त्यांच्या तब्येतीविषयी प्रत्येकवेळेला वेगवेगळी अपडेट येत आहे जी अनेकदा धक्का देऊन जाते.(Raju Srivastava's old video on Lal Singh Chaddha goes viral)

Raju Srivastava's old video on Lal Singh Chaddha goes viral
विजय देवरकोंडाचा वादग्रस्त व्हिडीओ, अभिनेत्याची बॉडी लॅंग्वेज लोकांना खटकली

१८ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं समोर आलं आणि बोललं गेलं की, त्यांच्या मेंदूनं काम करणं बंद केलं आहे, हार्टही योग्य काम करत नाही, डॉक्टरांनीही देवावर विश्वास ठेवा असं म्हटलंय. पण आता राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणं बंद केलेलं नाही. तो आता पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित काम करत आहे. फक्त कॉमेडियन कोमामध्ये आहेत.

यादरम्यानच आता राजू श्रीवास्तव यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजू श्रीवास्तव आपल्या युट्यूब चॅनेलवर जवळपास सर्वच मुद्द्यावर व्हिडीओ शेअर करायचे. हा व्हिडीओ आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमाशी संबंधित आहे. त्यांनी आमिरच्या लाल सिंग चड्ढाविषयी या व्हिडीओत भाष्य केलेलं दिसत आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज झाला आहे. पण बॉयकॉट प्रकरणामुळे सध्या सिनेमा खूपच वाईट अवस्थेत सुरु आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमाची अवस्था बघवेनाशी झाली आहे. लोकांनी आमिरच्या सिनेमावर बहिष्कार या कारणासाठी घातला कारण आमिरने कितीतरी कार्यक्रमात बोलताना आणि आपल्या काही सिनेमातून हिंदू धर्माचा अपमान केला होता. राजू श्रीवास्तव यांना देखील आमिरची ही गोष्ट खटकत होती. राजू श्रीवास्तव यांचा व्हायरल व्हिडीओ या बातमीत आम्ही जोडलेला आहे.

Raju Srivastava's old video on Lal Singh Chaddha goes viral
२७ वर्ष ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करणारी नुपूर अलंकार बनली सन्यासी, मोठं कारण समोर

हा व्हिडीओ राजू श्रीवास्तव यांनी ५ ऑगस्टला शेअर केला होता. यामध्ये ते बोलताना दिसत आहेत,''एक सिनेमा येत आहे,लाल सिंग चड्ढा. आता या सिनेमाला विरोध केला जात आहे. सोशल मीडियावर सिनेमाविरोधात कमेंट केलेल्या दिसत आहेत,'बॉयकॉट. या सिनेमाला पाहू नका'. आणि काही लोक म्हणत आहेत की,'या सिनेमाच्या तिकीटाचे पैसे वाचले तर ते देणगी म्हणून कोणाला तरी द्या. कोणा गरीबाला जेवू घाला'. अशा गोष्टी बोलल्या जात आहेत.

Raju Srivastava's old video on Lal Singh Chaddha goes viral
गिरगावातील राजेश खन्ना स्पेशल दहीहंडी माहीत आहे का?काय सांगतो इतिहास?वाचा..

राजू श्रीवास्तव त्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत, ''निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आमिर खान तर पुढे येऊन आता बोलत आहे की, मी देशभक्त आहे. माझ्यावर आरोप करू नका. शंका घेऊ नका. पण त्यांच्याकडून अशा अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत. ज्यामुळे आता हा सगळा गोंधळ झाला आहे. आता बघा एक आमिरचा सिनेमा आलेला ज्याचे नाव होते पीके. आता पीके सिनेमात आमिरनं धार्मिक भावनांची किती खिल्ली उडवली होती. शंकर भगवानला कसं दाखवलं गेलं होतं. तेव्हा विचार करायला हवा होता. आपला देश श्रद्धेवर विश्वास ठेवणारा देश आहे. लोकांची मन यामुळे दुखावली जातात.''

राजू यांनी पुढे म्हटलं आहे की, ''हे तर आपण बोलू शकत नाही की हे नकळत झालं, की पैसे कमवण्याच्या नादात झालं. पैशासाठी काहीही करणं सुरू आहे. आजकाल तो बोलतोय,मी देशभक्त आहे. जर तुम्ही देशभक्त आहात मग अमरावती,उदयपुर घटना घडल्या तेव्हा का चुप्पी साधली. हेच लोकांच्या दिसण्यात येत. लोक पाहत असतात. आता सिनेमाला बॉयकॉट केल्यावर आमिर बोलतोय एवढा की मी देशभक्त आहे तर चला सिनेमा पाहूया कसा बनवलाय ते. कारण सिनेमात हिंदू,मुसलमान, शीख,ईसाई सगळ्यांनी काम केलं आहे. एक कंपनी बंद पडली की मोठं नुकसान होतं. खूप लोकांच्या कामावर गदा येते. हे सगळे प्रश्न रोजगाराशी जोडलेले असतात''.

राजू श्रीवास्तव यांनी सेन्सॉर बोर्डावर देखील प्रश्न निर्माण केले होते. ते म्हणाले होते की,'' सेन्सॉर बोर्ड अशा सिनेमांना कशी परवानगी देतं. पीकेमध्ये जे केलं होतं त्याला कशी परवानगी दिली सेन्सॉरने. तिथे कसा सिनेमा पास झाला. कधीकधी वाटतं की मीडियात एवढं सगळं सुरू आहे तर हा एक पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. आपण सगळे याला गंभीर विषय म्हणून पाहत आहोत, पण आमिर खानला याचा फायदा होत असेल. हे सगळे डोकेबाज लोक आहेत. आमिरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं देखील म्हटलं होतं की तिला भारतावर विश्वास नाही. भारतात सुरक्षित वाटत नाही. कोणत्यातरी दुसऱ्या देशात जाऊन राहणार. आता काय बरोबर,काय चूक. आता तुम्ही लोक जो निर्णय घ्याल,मी तुमच्यासोबत असेन''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com