अभिनेत्री नुपुर अलंकारचा धक्कादायक निर्णय, 'त्या' एका कारणानं चक्क घेतला सन्यास Nupur Alankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nupur alankar takes sanyaas the actress has quit showbiz went to hmalayas...

अभिनेत्री नुपुर अलंकारचा धक्कादायक निर्णय, 'त्या' एका कारणानं चक्क घेतला सन्यास

T.V Actress Nupur alankar: छोट्या पडद्यावरची अभिनेत्री नुपूर अलंकार विषयी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. २७ वर्ष तिनं टी.व्हीवर आपल्या अभिनयानं लोकांचे मनोरंजन केल्यानंतर आता अचानक इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. नुपूरने आपलं ग्लॅमर आयुष्य मागे सोडून सन्यासी बनण्याचा विचार केला आहे. चला जाणून घेऊया अभिनेत्रीसोबत असं काय घडलं की तिनं अभिनय सोडून थेट सन्यास स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.(Nupur alankar takes sanyaas the actress has quit showbiz went to hmalayas...)

हेही वाचा: सचिनचं पहिलं लग्न झालंय म्हणून सुप्रियाने नकार दिला होता? जाणून घ्या लव्हस्टोरी

नुपूर अलंकार 'शक्तिमान', 'दीया और बाती हम','घर की लक्ष्मी बेटीया' अशा मालिकांमधून काम करताना दिसली आहे. गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावर अभिनय साकारल्यानंतरही नुपूरला ते समाधान नाही मिळालं ज्याच्या ती शोधात होती. तिनं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ''मी फेब्रुवारी महिन्यात सन्यास घेतला होता. मी सध्या तीर्थयात्रा करण्यात व्यस्त आहे. मी गरजू लोकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच अध्यात्माची ओढ होती आणि मी आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात त्याचे पालनही करत आली आहे. म्हणूनच मी पूर्णपणे आता अध्यात्माच्या मार्गावर स्वतःला झोकून देण्याचा विचार केला आहे. मी गुरु शंभू शरण झा यांच्या मार्गदर्शनाने धन्य झाली आहे,त्यांनी माझ्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे''.

हेही वाचा: शेखर सुमनना असं काय जाणवलं की राजू श्रीवास्तवना दिलेला तब्येत सांभाळण्याचा सल्ला

अभिनेत्री नुपूर अलंकार सन्यास धर्म स्विकारल्यांतर हिमालयाच्या यात्रेवर निघून गेली आहे. ती म्हणते, ''खरंतर हा एक मोठा निर्णय होता. मी माझ्या मुंबईतील घराला भाड्यानं दिलं आहे, म्हणजे त्या पैशावर माझा बेसिक नेहमीचा खर्च,प्रवासाचा खर्च निघेल''. तर आपल्या सन्यासी लूकविषयी बोलताना ती म्हणाली की,''कितीतरी लोकांना वाटतं मी भावनेच्या आहारी जाऊन हा निर्णय घेतला आहे. मी मनातून ढासळली आहे. आयुष्याला कंटाळली आहे म्हणून सन्यास स्विकारला आहे. पण ही गोष्ट खरी नाही''.

हेही वाचा: विजय देवरकोंडाचा वादग्रस्त व्हिडीओ, अभिनेत्याची बॉडी लॅंग्वेज लोकांना खटकली

लॉकडाऊनच्या दरम्यान नुपूर अलंकार खूप मोठ्या आर्थित विवंचनेत अडकली होती. तिनं लोकांकडे यासाठी मदतही मागितली होती. यादरम्यानं तिची आईही अंथरुणाला खिळली होती. आईच्या औषधोपचारासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. अगदी ५०० रुपयासाठी तिला झगडावं लागलं होतं. त्यानंतर तिनं क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर मदत मागितली आणि तिला मदत मिळाली. त्याचबरोबर टी.व्ही इंडस्ट्रीतूनही काही लोकांनी तिला मदत केली. नुपूरचे म्हणणे होते की, ''२०१९ पासूनच ती आई आजारी असल्यामुळे तिच्या सेवेतच व्यस्त असायची,त्यामुळे तिला काम करायला मिळत नव्हते''.

हेही वाचा: गिरगावातील राजेश खन्ना स्पेशल दहीहंडी माहीत आहे का?काय सांगतो इतिहास?वाचा..

नुपुर म्हणते की,''माझ्या आयुष्यात आता अभिनयाला जागा नाही. डिसेंबर २०२० मध्ये माझ्या आईचं निधन झालं. तेव्हा मला जाणीव झाली की आता माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. मी सगळ्याच कर्तव्यांमधून आणि अपेक्षांमधून मुक्त झाल्याची मला अचानक जाणीव व्हायला लागली''. ती पुढे म्हणाली की, ''मला सन्यास घ्यायला थोडा उशीर झाला कारण माझे जीजू अफगाणिस्तानात अडकले होते,जेव्हा तालिबाननं तो देश ताब्यात घेतला''.

हेही वाचा: 'मिस यू पट्या!' दिवंगत प्रदीप पटवर्धन आणि गिरगावची दहीहंडी,आहे खास कनेक्शन

नुपूरने २००२ मध्ये टी.व्ही अभिनेता अलंकार श्रीवास्तव सोबत लग्न केले होते. जेव्हा तिनं सासरी आपण सन्यास घेत असल्याचे सांगितले तेव्हा तिला पाठिंबा मिळाला. आणि सन्यास मार्गावर निघण्यापूर्वी आपण आपल्या पती आणि सासूला भेटून त्यांच्या सहमतीनं आल्याचं नुपूर म्हणाली. आपण नेहमीच एक चांगली सून म्हणून राहिलो आहोत असं देखील नुपूर म्हणाली. नुपूरला तिच्या अडचणीच्या काळात CINTAA ने देखील सहकार्य केल्याचं ती म्हणाली. यासाठी तिनं CINTAA चे धन्यावादही मुलाखतीत मानले आहेत.

Web Title: Nupur Alankar Takes Sanyaas The Actress Has Quit Showbiz Went To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..